cm Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

Goa CM On Congress : भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे म्हणाल्या, महिला कोणत्याही क्षेत्रात असल्या तरी त्या पूर्ण निष्ठेने काम करत असतात. महिलांचा सन्मान करण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa CM On Congress

तीन पिढ्या पंतप्रधानपद लाभलेल्या घराण्याने सामान्यांसाठी किती योजना सुरू केल्या, असा खडा सवाल करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेसपासून सावध राहण्याचे आणि २०४७ पर्यंत विकसित भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन कुंकळ्ळी येथे जाहीर सभेत बोलताना केले.

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांनी मंगळवारी कुंकळ्ळी मतदारसंघात प्रचार दौरा केला.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपने राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामसडक योजना, उजाला, उज्ज्वला योजना, शौचालय योजना सारख्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन हजारांचे अर्थसाह्य, गृहिणींना दीड हजारांचे अर्थसाह्य, वधूंसाठी लाडली लक्ष्मी योजनेखाली लाखाचे अर्थसाह्य योजना कार्यान्वित केल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

धेंपे यांनी दौऱ्यात गुडी पारोडा,आंबावली पंचायत आणि नंतर कुंकळ्ळीपालिका क्षेत्रात बैठकांना हजेरी लावली. यावेळी मंत्री सुभाष फळदेसाई, बाबू कवळेकर, क्लाफासिओ डायस, नागालँडच्या खासदार एस. कोनियाक, मच्छिंद्र देसाई, मारुती देसाई, सुदेश भिसे, पंच दीपक खरंगटे, मिनाक्षी नाईक, सूर्या नाईक उपस्थित होते.

मोदींच्या स्वप्नपूर्तीसाठी मत द्या !

भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे म्हणाल्या, महिला कोणत्याही क्षेत्रात असल्या तरी त्या पूर्ण निष्ठेने काम करत असतात. महिलांचा सन्मान करण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे.

भाजपला मत म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या विकसित भारताच्या स्वप्नाला पाठिंबा देण्यासारखे आहे, असे त्या म्हणाल्या. मी दक्षिण गोव्याची कन्या असून, असोळणा माझे मूळ गाव आहे. कुंकळ्ळी माझ्या घराप्रमाणे आहे. सर्वत्र चांगला प्रतिसाद लाभत आहे, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 17 September 2025: नोकरीत वरिष्ठांचा विश्वास मिळेल, कामाच्या ठिकाणी कौतुक होईल;प्रवासात यश

Pramod Sawant In Mumbai: "कामगारांचे कल्याण आणि सर्वांगीण विकासासाठी गोवा कटिबद्ध", 'OSH India 2025' मध्ये मुख्यमंत्री सावंतांचे प्रतिपादन

Goa Politics: "मंत्र्यांना सेवा नको, फक्त पैसा हवा...", मंत्री तवडकरांच्या नाराजीवरुन गिरीश चोडणकरांचा सरकारला टोला

Sam Konstas Century: कसोटी सामन्यात 'वनडे'चा तडका! बुमराहशी पंगा घेणाऱ्या पठ्ठ्यानं ठोकलं तूफानी शतक; भारतीय गोलंदाज हवालदिल

India vs Pakistan: लायकीवर उतरला पाकिस्तानी खेळाडू! सूर्यकुमार यादवला दिली शिवी; म्हणाला, "भारताला लाज वाटली पाहिजे" Watch Video

SCROLL FOR NEXT