Goa: सुरावली ते बाणावली (Suravali To Benaulim) या दरम्यानचा 2.75 किमी अंतराचा पश्चिम बगल (Western bypass) रस्ता बांधण्यासंदर्भात निकाल देण्यापूर्वी आपली बाजूही ऐकून घ्यावी अशी मागणी करणारी हस्तक्षेप याचिका (Intervention petition) बाणावली येथील साळ नदी बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्या रॉयला फर्नांडिस (Social Worker Royla Fernandes) यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा पिठात (Goa Bench) दाखल केली. हे 2.75 किलोमीटरचे क्षेत्र जैव विवीधतेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असल्याने या भागात रस्ता मातीचा भराव घालून बांधण्याऐवजी स्टिल्टवर बांधावा अशी त्यांची मागणी असून त्यांनी यापूर्वी यासाठी राष्ट्रीय हरित लवादासमोर (National Green Arbitration) दावा दाखल केला होता. लवादाने या दाव्याची दखल घेत फर्नांडिस यांनी जे हरकतीचे मुद्दे पुढे आणले होते त्यावर विचार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यास करण्याचा आदेश दिला होता.
या रस्त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घेत जी जनहित याचिका विचारात घेतली होती तिची सुनावणी बुधवारी होणार त्यापूर्वी फर्नांडिस यांनी आज ही याचिका दाखल केली. ही याचिका न्यायालयाने वर्ग करून घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पावसकर यांनी या बगल रस्त्याचे जे काम राहिले होते, त्याला गणेश चतुर्थी नंतर सुरवात केली जाईल अशी माहिती दिली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.