Goa Weather Updates on Diwali Festival Dainik Gomantak
गोवा

'दिवाळी सणाला' पावसाचे गालबोट..

नागरिकांची तारांबळ, नरकासूर कामात व्यत्यय

दैनिक गोमन्तक

डिचोली : परतीचा पाऊस (Rain) काही अद्याप थांबण्याची चिन्हे दिसत नाही. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह रविवारी सायंकाळी डिचोलीतील (Bicholim) बहूतेक भागात पावसाने हजेरी लावली. पाऊस जरी जोरदारपणे पडला नसला, तरी दिवाळीच्या तोंडावर पर्जन्यवृष्टी (Goa Weather Updates) झाल्याने व्यापारी आणि नागरिकांची तारांबळ उडाली. काही ठिकाणी अंतिम टप्प्यात आलेले नरकासूर (Narkasur) सुरक्षित ठिकाणी हलविण्याची पाळी

युवक मंडळावर आली. कामे करण्यातही व्यत्यय आला. आजच्या पावसामुळे डिचोलीसह सर्वण, कारापूर आदी बहूतेक भागात वीज पुरवठ्यात खंड पडला होता. रात्री उशिरापर्यंत सर्वत्र काळोखाचे साम्राज्य पसरले होते. दरम्यान, हवामान वेधशाळेने वर्तविलेला अंदाज खरा ठरल्यास दिवाळी सणाला पावसाचे गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नरकासूर सुरक्षित स्थळी

दिवाळीनिमित्त डिचोलीत गावोगावी नरकासूर उभे करण्याची कामे जोरात सुरु आहेत. नरकासुरांचे काम अंतिम टप्प्यातही आले आहेत. काही भागात सुरवातीपासूनच गावातील मंदिर वा अन्य सुरक्षित जागी नरकासूर करण्यात येत आहेत. तर काही भागात उघड्यावरच नरकासूर करण्यात येत आहेत. आज सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होताच युवक मंडळांची धावपळ सुरु झाली. उघड्यावर करण्यात आलेले नरकासूर सुरक्षित ठिकाणी हळविण्यात आले.

भातपिकावर परिणाम नाही

डिचोलीतील बहूतेक भागात भाताची कापणी आणि मळणी पूर्ण झाली आहेत. काही भागात अजूनही ही कामे चालू असून, ती अंतिम टप्प्यात आली आहेत. मात्र आज जोराचा पाऊस पडला नसल्याने विशेष परिणाम जाणवला नाही. आजच्या पावसामुळे तालुक्यात कोणतीही विपरीत घटना घडलेली नाही. डिचोली अग्निशमन दलाकडूनही या माहितीस दुजोरा मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cooch Behar Trophy: 'अव्वल'साठी गोवा मैदानात, कुचबिहार क्रिकेट स्पर्धेत चंडीगडविरुद्ध लढत

गोव्यात पोट भरणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणावर प्राणघातक हल्ला; झारखंडच्या संशयिताला पणजीत अटक

Goa Today News Live: सर्वत्र खंडणी, भ्रष्टाचार! गोव्यातील आणखी एका भाजप नेत्याचा सरकारवर आरोप; केजरीवालांनी शेअर केला व्हिडिओ

Bicholim: डिचोली तालुक्यात भाजी, मिरची लागवडीची लगबग; दीडशेहून अधिक हेक्टर क्षेत्रात उत्पादन शक्य

Mapusa: म्हापशातील कोमुनिदाद प्रशासक इमारत कमकुवत, शासनाकडून दखल नाही; कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका

SCROLL FOR NEXT