Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: गोव्यातून पावसाची एक्झिट नाहीच! मध्यम पावसाची शक्यता, हवामान खात्याचा 'यलो अलर्ट'

Goa Rain: मान्सूनचा कालावधी संपल्यानंतर राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून सध्या स्थिती स्थिर आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: मान्सूनचा कालावधी संपल्यानंतर राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून सध्या स्थिती स्थिर आहे. मात्र, गुरुवारी राज्यभर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात असून हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

मागील २४ तासांत राज्यात सरासरी ०.७ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. साखळी, मुरगाव, म्हापसा यांसारख्या भागात अतिशय तुरळक पाऊस नोंदविण्यात आला.

राज्यातील तापमानही सामान्य स्थितीत असून, कमाल ३१ अंश सेल्सिअस तर किमान २३ अंश सेल्सिअस इतकी नोंद करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागातील मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पर्यटकांनीदेखील समुद्रकिनाऱ्यावरील क्रियांमध्ये काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Accident: कर्नाटकात प्रवाशांवर काळाचा घाला! बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक; 4 ठार, 14 जखमी

Land Compensation: जमीन मोबदल्यासाठी 7 वर्षांची प्रतीक्षा! 15 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या; गोवा खंडपीठाचे निर्देश

World Peace University: तंत्रज्ञानाने जग जवळ आले, पण मने दूरच! विश्वशांतीसाठी राज्यपालांचे महत्त्वाचे आवाहन; 'डब्ल्यूपीयू'च्या परिषदेचे थिवीत उद्‌घाटन

खरी कुजबुज: मंत्र्यांचा पाठिंबा नेमका कोणाला?

Bungalow Sale Fraud: बंगला विक्रीचे आमिष दाखवून निवृत्त कर्मचाऱ्याला गंडा; 99.50 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT