Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: गोव्यात पाच दिवस यलो अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Pramod Yadav

Goa Weather Update

गोव्यात आजपासून (19 जून) पाच दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याकाळात राज्यात 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता गोवा हवामान खात्याच्या वेधशाळेने वर्तवली आहे.

तसेच, पुढील तीन तास उत्तर गोव्यात विविध ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळने वर्तवली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात 19 ते 25 जून या काळात पावसाची शक्यता असून, यातील पाच दिवस बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरुपचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

उत्तर आणि दक्षिण गोव्यात 19, 20, 22 आणि 23 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 21 जून रोजी तुरळक ठिकाणी जोरदार सरी बरसतील असा अंदाज खात्याने वर्तवला आहे.

उत्तर गोव्यासाठी पुढील तीन तास महत्वाचे

उत्तर गोव्यात पुढील तीन तास महत्वाचे असून, जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

दरम्यान, गोव्यात पावसाचा जोर मंदावला असून, आत्तापर्यंत 490 मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र, आत्तापर्यंत 454.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर मंदावल्याने सरासरीच्या तुलनेत सात टक्क्यांनी पाऊस घटला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

MP Viriato Fernandes: गोवा आणि गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण! देशाच्या संरक्षण समितीवर कॅ.विरियातो फर्नांडिसांची नियुक्ती

Goa Politics: 'मुख्यमंत्री महोदय 2 लाख नोकऱ्यांबाबत तपशीलवार माहिती द्या...'; कॉंग्रेसचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT