Goa rain update | Goa yellow alert weather Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार; 'यलो अलर्ट' जारी

Goa Weather Update: विदर्भात समुद्रसपाटीपासून ७.६ किमी अंतरावर चक्रीय वारे घोंगावत आहे. त्यासोबतच, कर्नाटकातील काही भागात टर्फ निर्माण झाला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यात मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पावसाचे धुमशान सुरू असून सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले असून ऐन चतुर्थीत पावसाची तीव्रता वाढली आहे.

विदर्भात समुद्रसपाटीपासून ७.६ किमी अंतरावर चक्रीय वारे घोंगावत आहे. त्यासोबतच, कर्नाटकातील काही भागात टर्फ निर्माण झाला आहे. याच्या प्रभावातून पावसाचा जोर वाढला असून पुढील चार-पाच दिवस राज्यात मध्यम पाऊस कायम राहणार असल्याने गोवा वेधशाळेद्वारे 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

राजधानी पणजीतील दयानंद बांदोडकर रस्त्याबाजूच्या कांपाल रस्त्यावर प्रामुख्याने आरोग्य संचालनालयापासून कला अकादमीपर्यंतच्या अंतर्गत रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रस्त्याच्या बाजूची गटारे तुंबल्याने हा प्रकार घडला आहे.

त्यासोबतच बसस्थानकाशेजारील पणजीत प्रवेश करण्यासाठीच्या मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यात पाणी साचले आहे. त्यामुळे दुचाकीवरून वाहतूक करणाऱ्यांना समस्यांना सामोरे जावे लागत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Purple Fest Goa: 'पर्पल फेस्ट'चा तिसरा अध्याय पूर्ण, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती!

Rama Kankonkar: ''तपासात कोणत्याही राजकारण्याचे नाव नाही'', रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा!

Borim Bridge Issue: बोरी पुलाचा खोळंबा! वाहतुकीसाठी खुला न झाल्याने गोंधळ

Renuka Devi History: यल्लम्मादेवी! नरसंहारातील पीडित समुदायांची तारणहार

Viral Video: "तू इथे आलास तर तुझं मुंडकं कापेन!"; विनातिकीट प्रवास करणाऱ्या शिक्षिकेचा टीटीईला धमकी देणारा दुसरा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT