Margao Gangwar: मुंगूल-मडगाव गँगवॉरचे बिश्नोई गँगशी कनेक्शन; कुख्यात गुंड 'ओमसा'ला राजस्थानमधून अटक

Mungul Assault Case: हल्ला करण्यासाठी ओमसा याला खास राजस्थानहून बोलावून घेण्यात आले होते, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
Mungul - Margao Assault Case
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मुंगूल-मडगाव येथे दोन गँगच्या वर्चस्वातून झालेल्या गँगवॉरकडे कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग असल्याचे आता उघड झाले आहे. या प्रकरणात फातोर्डा पोलिसांनी बिश्नोई गँगचा एक कुख्यात गुंड ओमसा (३०) याला राजस्थानमधून अटक केली आहे. ओमसा याचे खरे नाव ओम प्रकाश राम असे असून त्याच्याविरोधात राजस्थान पोलिसांत अनेक गुन्हे नोंद झाले आहेत.

१२ ऑगस्ट रोजी पहाटे २.३० वा.च्या सुमारास मुंगूल येथे बिश्नोई गँगकडून वॉल्टर गँगच्या युवकेश सिंग (२४) व रफीक ताशन (२४) या दोघांवर प्राणघातक हल्ला केला होता. हा हल्ला करण्यासाठी ओमसा याला खास राजस्थानहून बोलावून घेण्यात आले होते, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

दरम्यान, त्या गाडीत वॉल्टर असावा असे वाटल्यानेच हा हल्ला केला होता. दक्षिण गोव्यातील गुन्हेगारी विश्वावर वर्चस्व मिळविण्यासाठी हा हल्ला केला होता, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

Mungul - Margao Assault Case
Vishwajit Rane Meet Fadanvis: मंत्री विश्वजीत राणेंनी मुंबईत घेतली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

आतापर्यंत २३ जणांना अटक

१) या प्रकरणात फातोर्डा पोलिसांनी फोंड्यातील अमोघ नाईक गँगच्या सूरज नाईक बोरकर (२६) यालाही अटक केली असून बोरकर याला अमोघ नाईक याचा उजवा हात म्हणून ओळखले जात आहे.

२) या प्रकरणात पोलिसांनी सूरजकडून एक इनोव्हा कारही जप्त केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या २३ वर पोहोचली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com