गेले काही दिवस दडी मारलेला पाऊस राज्यात आता दमदार हजेरी लावणार असल्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. गेले काही दिवस राज्यात प्रखर सुर्यकिरण नसले तरी पावसाने ही दडी मारल्याचं चित्र आहे. त्यामूळे डोंगर माथ्यावर असणाऱ्या खरीप पिकांना आता पाण्याची गरज आहे. असे असाताना पावसाच्या शक्यतेने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
राज्यातील काही भागांचा अपवाद वगळता पाऊस लागलाच नसल्याचे चित्र गेले चार ते पाच दिवस राज्यात आहे. असे असले तरी येत्या दोन दिवसात पावसाची दमदार एन्ट्री होणार असल्याने आता शेतीच्या कामांना वेग येणार आहे. कारण हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 10 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पाऊसाची शक्यता आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदानुसार आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर उद्यापासून यलो अलर्ट जारी केला असल्याचं ही सांगितलं आहे. त्यामूळे शेतकरी वर्गाला काहीसां दिलासा मिळणार आहे.
Goa Panchayat Election 2022: कारापूर-सर्वण प्रचार अंतिम टप्प्यात
डिचोली: कारापूर-सर्वण पंचायतीत प्रचाराची रणधुमाळी सुरु असून, प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. सर्वच प्रभागांत चुरस निर्माण झाली आहे. बहुतेक प्रभागांत अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा आपले भवितव्य अजमावत असलेल्या काही मावळत्या पंचसदस्यांसमोर नवोदितांनी आव्हान उभे केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.