Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: राज्यात तापमानाचा पारा 33.6 अंशांवर, काही भागात पहाटे थंडी

Goa Weather: राज्यात मागील दोन-तीन दिवसांपासून उष्म्याच्या झळा जोरदार वाढू लागल्या असून तापमानाचा पारा अधिकच वाढला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यात मागील दोन-तीन दिवसांपासून उष्म्याच्या झळा जोरदार वाढू लागल्या असून तापमानाचा पारा अधिकच वाढला आहे. राज्यात कमाल ३३.६ अंश तर किमान २१ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली.

कमाल तापमानाच्या तुलनेत १.२ अंशांनी वाढले असून येत्या दोन दिवसांत पारा तब्बल ३४ ते ३५ अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता असल्याने वाढत्या उष्म्यात नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन गोवा वेधशाळेद्वारे करण्यात आले आहे.

लहान मुले, ज्येष्ठांची घ्या काळजी

फेब्रुवारी महिन्यात कमाल तापमान ३२ अंशांपर्यंत जाणे सामान्य तापमान मानले जाते. परंतु याहून अधिक तापमान झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना सहन होते परंतु लहान मुले, वृद्ध तसेच दीर्घकालीन आजारी व्यक्तींना अशा उष्म्याचा त्रास होण्याची शक्यता असते.

त्यामुळे योग्य ती काळजी घेणे जरूरीचे असते. उष्म्यामुळे निर्लजलीकरण (डिहायड्रेशन), यूंना गोळे येणे (हीट क्रॅम्प) व त्वचेवर पुरळ (हीट रॅश) होण्याची शक्यता अधिक असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Ship Attack: ओमानच्या समुद्रातील तणाव शिगेला, चार दिवसांत भारतीय जहाजावर तिसरा हल्ला; भारतानं अमेरिकन राजदूताला बजावलं समन्स

Kane Williamson Retirement: न्यूझीलंड क्रिकेटचा सुवर्ण अध्याय संपला! केन विल्यमसनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; लॉर्ड्स कसोटी संपताच चाहत्यांना मोठा धक्का VIDEO

मध्यपूर्वेत व्यापारी जहाजांवर हल्ले! भारतीयांच्या सुरक्षेसाठी मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये; सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट जारी

किम जोंगच्या देशाविरुद्ध पाऊल उचलणं पडलं महागात! दक्षिण कोरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांना कोर्टानं सुनावली 30 वर्षांची शिक्षा; काय नेमकं प्रकरण?

Sachin Tendulkar: सुनेच्या बॉलिंगवर क्रिकेटचा देव OUT, कॅच झेलताच लेकीनं केला जल्लोष; विमानातच रंगला सामना Watch Video

SCROLL FOR NEXT