Temperature rise in goa Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: गोव्यात थंडीचा जोर मंदावला, उकाडा वाढला; वेधशाळेने सांगितला पुढील दहा दिवसांचा अंदाज

Goa Winter Weather Changes: राज्यात अग्नेय दिशेकडून वाहणारे वारे हे उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याच्या तुलनेत अधिक प्रभावी असल्याने थंडी मंदावली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Weather Update

पणजी: राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर मंदावला आहे, तसेच उष्म्यातही वाढ झाली आहे. राज्यात अग्नेय दिशेकडून वाहणारे वारे हे उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याच्या तुलनेत अधिक प्रभावी असल्याने थंडी मंदावली आहे. त्यामुळे पुढील दहा दिवस राज्यात थंडीचा प्रभाव कमी राहणार असल्याची माहिती गोवा वेधशाळेचे संचालक नहूष कुलकर्णी यांनी दिली.

कुलकर्णी म्हणाले, केवळ गोव्यातच (Goa) नव्हे तर शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकातही मोठ्या थंडीचा प्रभाव मंदावला असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यावेळी सर्वसामान्य तापमानाच्या तुलनेत एक किंवा दोन अंशांनी तापमान वाढले किंवा घटले तर ते सामान्य मानले जाते. कारण निसर्गात सातत्याने बदल घडत असतात; परंतु ज्यावेळी तापमान २ अंशांहून अधिक वाढते, त्यामागे अनेक कारणे असतात. राज्यात किमान तापमान १८ ते २२ अंशांपर्यंत असेल तर ते सामान्य तापमान गृहीत धरले जाते; परंतु २४ अंशांवर पोहोचणे म्हणजेच थंडीचा प्रभाव कमी झाल्याचे संकेत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

जानेवारीत किमान तापमानात घट

राज्यात जानेवारी महिन्यात सर्वसामान्यपणे किमान तापमान (Temperature) हे १९ ते २० अंश सेल्सिअस इतके असते; परंतु मागील काही दिवसांपासून किमान तापमानात वाढ होत आहे. आज पणजी येथे कमाल ३४ तर किमान २४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT