Weather Forecast Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Forecast: बागायतदारांवर हवामान बदलांचे संकट; दरवर्षीपेक्षा यंदा काजूचे उत्पादन घटले

Goa Weather Forecast: काजूचा दरही कमी झाल्याने मजुरीला घातलेला खर्च देखील निघेल कि नाही अशी शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाला तोड द्यावे लागतेय.

Ganeshprasad Gogate

Goa Weather Forecast: परदेशात तापमानवाढीच्या कहर केला असताना गोव्यासारख्या निसर्गरम्य राज्यातही यंदा हवामान बदलांचा प्रभाव जाणवू लागला आहे.

प्रचंड उष्मा, आकस्मिक एकाच दिवशी 6 इंचाहून अधिक पाऊस, हिवाळी थंडीत कमतरता आदी प्रकार जाणवू लागल्याने गोव्यातील बागायतदार अडचणीत सापडले आहेत.

सध्या काजू-आंबा सुरु झाला असून त्यातच हे असे हवामान बदलत असल्याने राज्यातील बागायतदार चिंतेत आहेत. दरवर्षीपेक्षा यंदा काजूचे कमी उत्पादन असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

या सोबतच काजूचा दरही कमी झाल्याने मजुरीला घातलेला खर्च देखील निघेल कि नाही अशी शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाला तोड द्यावे लागतेय.

त्यातच काजू बागायतींना आगी लागत असल्याने ते एक वेगळे संकट थोपवण्याचे बाग मालकांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

यावर पावले उचलणे काळाची गरज बनली आहे. अन्यथा आर्थिक उत्पनाचा स्रोत म्हणून शेती- बागायतींकडे बघण्याचा युवा पिढीचा दृष्टिकोन बदलेल अशी भीती आंबा- काजू बागायतदारांनी बोलून दाखवली आहे.

2022 मध्ये उन्हाळ्यात गोव्यातील तापमान 37अंशावर पोहोचते. मागील उन्हाळ्यात 39 अंशांपर्यंत तापमानात वाढ झाली होती. 2013, 2009 व 2008 साली देखील तापमान वाढ मोठ्या प्रमाणात झाली.

मागील साठ वर्षांचा तापमानाचा तपशील पाहता 0.5 अंशांनी सातत्याने तापमानात वाढ होत असून ही चिंताजनक बाब असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

रामा काणकोणकर हल्ला प्रकरण; गुंड जेनिटोसह आठ जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: कर्नाटकातील कोप्पल येथील स्पर्धेसाठी गोवा संघ रवाना

SCROLL FOR NEXT