Goa Weather Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: गोव्यातील जंगलात कारवीच्या फुलांमध्ये घट; राज्याला भेडसावणार हवामान बदल?

किनाऱ्यांची धूप होत असल्यावरून पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली चिंता

Akshay Nirmale

Goa Weather: हवामान बदलाच्या परिणामामुळे गोव्यात केवळ समुद्रकिनाऱ्याचीच धूप होत नाही, तर पाऊस आणि फळे पिकण्याच्या पद्धतींसह फुलांच्या हंगामातही बदल होत असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गोव्यातील जंगलांमध्ये कारवी या फुलांचे प्रमाण घटले आहे. त्यावरून गोव्यातील हवामानात बदल होण्याची शक्यता पर्यावरणतज्ज्ञ राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केली आहे. इंग्रजी प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.

राजेंद्र केरकर म्हणतात की, हवामान बदलाचा परिणाम पश्चिम घाटावर सहज दिसून येतो. पश्चिम घाटातूनच झुआरी आणि मांडवी नद्यांचा उगम होतो. या नद्यांचा प्रवाह कमी झाला असून पूर्वीसारखा राहिलेला नाही. जंगलांच्या ऱ्हासामुळे या गोष्टी घडत आहेत.

वृक्षतोड आणि हवामानाच्या तीव्र परिस्थितीमुळे जंगलात वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. म्हादई वन्यजीव अभयारण्याच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांवर यंदा पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले होते.

स्ट्रोबिलॅन्थेस कॅलोसस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कारवी या फुलांची झुडपे आठ वर्षांतून एकदा फुलतात. या फुलांचा रंग निळा-जांभळा ते गुलाबी असा असतो. कारवीचे जैव चक्रात मोठे स्थान आहे.

वन्यजीव, मधमाशा, फुलपाखरे, पक्षी, किटक याकडे आकर्षित होत असतात. त्यातून परागीभवन होत असते. वातावरणातील बदलामुळे कारवीच्या फुलोऱ्यावर परिणाम झाला आहे.

सत्तरीच्या पश्चिम घाटातील म्हादई वन्यजीव अभयारण्यात अलीकडच्या काळात कारवीची फुले फारशी दिसलेली नाहीत. हवामान बदलाचा परिणाम राज्यातील पश्चिम घाट, किनारी भाग आणि जैवविविधतेवर झाला आहे.

आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना पर्यावरणवादी अभिजित प्रभुदेसाई म्हणाले की, हवामान बदलाचा परिणाम केवळ समुद्रकिनाऱ्यांवरच झाला नाही तर फळपिके आणि झाडांच्या फळधारणेवरही परिणाम झाला आहे. काजू उत्पादन आणि इतर कामांवर परिणाम झाला आहे.

तर येथील हवामान योग्य नसल्याने मासे प्रजननासाठी इतर ठिकाणी जात असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. किनारपट्टीची धूप होत असल्याने किनारे छोटे होत आहेत. हवामानातील बदलामुळे फळांचे नमुने आणि फुलांच्या हंगामात बदल झाले आहेत.

स्थलांतरित पक्ष्यांची संख्याही कमी झाली आहे. पूर आणि इतर कारणांमुळे गोव्यातील 15 टक्के जमीन नष्ट होईल. गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये पूर येण्याचे प्रमाण अधिक होत आहे.

नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट (NCSCM) च्या अहवालानुसार गोव्यातील सुमारे 105 किमी किनारपट्टीच्या पट्ट्यामध्ये 35 टक्के किनारपट्टी खडकाळ आहे. 20 टक्के स्थिर आहे. किनाऱ्यांची धूप होत आहे. त्याचा परिणाम पर्यटन अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.

गोव्याच्या 105 किमी लांबीच्या किनारपट्टीपैकी सुमारे 27 टक्के किनारपट्टीला धोका आहे. यापुर्वी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी इस्रोच्या अहवालानुसार दहा वर्षांत किनारपट्टीची धूप झाल्याने गोव्याची सुमारे 15.2 हेक्टर जमीन नष्ट झाली आहे, असे म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT