Goa Weather Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: थंडी मंदावली, तापमान वाढले! गोव्यात पुढचे काही दिवस कसे राहील हवामान? वाचा वेधशाळेचा अहवाल..

Goa Winter: राज्यात पुढील चार-पाच दिवस किमान तापमान हे २० ते २१ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यात मागील दोन-तीन आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या थंडीत काही अंशी घट झाली असून थंडीचा जोर मंदावला आहे. मागील २४ तासांत राज्यात कमाल ३३.५ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली असून किमान २०.७ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

सामान्य किमान तापमानाच्या तुलनेत ०.५ अंश सेल्सिअस अधिक तापमान नोंदविण्यात आले. राज्यात पुढील चार-पाच दिवस किमान तापमान हे २० ते २१ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे.

म्हणजेच राज्यात थंडीचा जोर अजूनही काही प्रमाणात मंदावण्याची शक्यता आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून रात्री जी कडाक्याची थंडी पडायची त्यात घट झाली आहे. रात्री पंखा किंवा वातानुकूलनाशिवाय झोपणे अशक्य होत आहे.

परंतु पहाटे पाचनंतर काही प्रमाणात थंडी पडत असून धुके देखील दाटत आहे. काही प्रमाणात पहाटे दव देखील पडत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ugvem Highway Landslide: उगवे महामार्गावर पुन्हा कोसळली दरड! आठवड्यातील तिसरी घटना; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मुरगाव बंदरातील धक्का क्रमांक 9चा फेरविकास अखेर रखडला, युद्धाचा फटका; 1,300 कोटींच्या निधीला केंद्राकडून नकार

Private Bus Service: मुसळधार पावसाचा फटका! गोव्यातून पुणे-मुंबईकडे जाणारी खासगी बससेवा विस्कळीत

अभिनेता सलमान खानला उच्च न्यायालयाची नोटीस, कांदोळी व्हिला बांधकामाविरोधातील जनहित याचिकेची दखल; यंत्रणांनाही नोटिसा

Horoscope: मंगळवारचा दिवस ठरणार भाग्यवर्धक! अनेक राशींना करिअरमध्ये यश, व्यवसायात नफा आणि धनलाभाचे प्रबळ योग

SCROLL FOR NEXT