Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू, अवकाळी पावसानंतर आता तापमान वाढणार, उष्णतेचा 'यलो अलर्ट' जारी

Yellow alert in Goa: राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे अनेक भागांत वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

Sameer Amunekar

पणजी: राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे अनेक भागांत वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, हवामानात झालेल्या या अचानक बदलानंतर आता गोव्यात उन्हाचा चटका अधिकच तीव्र होणार आहे. गोवा हवामान विभागाने येत्या ९ एप्रिलपर्यंत तापमान वाढीचा यलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. चार दिवसाचा यलो अलर्ट देण्यात हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

गोवा राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. अधूनमधून अवकाळी पावसाची हजेरी आणि त्यानंतर तीव्र उष्णतेची लाट अशा परिस्थितीमुळे शेतकरी आणि बागायतदार चिंतेच आहेत.

शनिवारी अनेक भागात मुसळधार पाऊस

शनिवारी (५ एप्रिल) पेडणे, सत्तरी, केपे आणि काणकोण या भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक भागांत झाडांची पडझड पाहायला मिळाली. विजेच्या तारांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा काही काळासाठी खंडित झाला. यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT