भिरोंडा येथे मंत्री विश्वजित राणे यांच्या सभेला लोकांचा प्रतिसाद  Dainik Gomantak
गोवा

भिरोंडा पंचायतीच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील: विश्वजीत प्रतापसिंह राणे

Dainik Gomantak

Goa: पर्ये मतदार (Poriem constituency) संघात येणाऱ्या भिरोंडा (Bhironda Village) पंचायत क्षेत्राच्या विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील असून आतापर्यंत या भागाचे आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे (Former CM Pratapsingh Rane) यांच्या सहकार्याने सरकारच्या माध्यमातून करोडो रुपयांची विकासकामे या पंचायत क्षेत्रात मार्गी लावली आहेत, त्याच प्रमाणे यापुढे ही विकासाची गती कायम राहणार आहे, या पंचायत क्षेत्रात येणाऱ्या काळात म्हादई नदीच्या काठावर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे, त्यामुळे या पंचायत क्षेत्राबरोबर आजूबाजूच्या परिसरात याचा फायदा होणार आहे. सदर प्रकल्पाचे काम कोविड-19 माहामारीच्या (Covid-19) निर्बंधांमुळे काम रखडले आहे. परंतु येणाऱ्या काळात प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपले प्राधान्य असणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Health minister Vishwajit Rane) यांनी भिरोंडा पंचायत सभागृहात संपन्न झालेल्या जाहीर सभेत बोलताना दिली.

या वेळी व्यासपीठावर नगरगाव जिल्हा पंचायत सदस्या राजेश्री काळे, भिरोंडा सरपंच आद्राद तेरेजा, उपसरपंच निकिता नार्वेकर, पंच सदा गावकर, उदयसिंह राणे, समिल बागी, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी पुढे बोलताना सांगितले की या भागाच्या विकासात आपले वडील पर्ये मतदार संघाचे आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या सहकार्याने व सरकारच्या माध्यमातून या भागात बरीच विकास कामे पुर्ण झाली आहेत, यामध्ये सर्व प्रभागात हॉटमिक्स डांबरीकरण, विज, पाणी, अंगणवाडी, पाडेली गुळेली पुल, शाळा तसेच माध्यमिक विद्यालयाचा विकास, त्यात महत्त्वाचे म्हणजे भोम पाडेली येथे जलसिंचन खात्याच्या अंतर्गत उभारण्यात आलेल्या जलप्रकल्प योजना, त्याद्वारे शेतकऱ्यांना शेतीसाठी लाभ झाला आहे.

या अतिरिक्त आपल्या राजकीय कारकीर्दीत या भागातील सुशिक्षित युवा युवतींना रोजगारात प्राधान्य दिले आहे, त्याच प्रमाणे या पुढेही सुशिक्षित बेरोजगारांना निराश होऊ देणार नाही, या साठी सरकारच्या माध्यमातून आपण कार्यरत आहे. त्यामुळे आज पर्यंत आपण सर्वांनी दाखवलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला नाही, आणि यापुढेही तडा जाऊ देणार नाही याची खात्री देऊन, अशाच प्रकारे सदैव आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे असे शेवटी आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य राजेश्री काळे, माजी सरपंच तथा विद्यमान पंच उदयसिंह राणे यांची समयोचित भाषणे झाली. सरपंच आद्राद तेरेजा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरेश राणे यांनी केले, तर समिल बागी यांनी आभार व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT