Goa : Water tanker supply water for Vadem. Dainik Gomantak
गोवा

Goa : वाडे कुर्डी वसाहतीत पाणीटंचाई

Goa : पंप नादुरुस्‍त : पाणीपुरवठा विभागाला अपयश; लोकांची तारांबळ

Mahesh Tandel, Manoday Fadte

सांगे : साळावली धरणग्रस्त (Salavalim Dam Land owners) भाग वाडे कुर्डी वसाहत क्रमांक एक मधील जनता पावसाळ्यातही पाणीटंचाईचा (Water Shortage Problem) सामना करत आहे. पाणीपुरवठा करणारा पंप जळाला (Pump) म्हणून पर्यायी व्यवस्था करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाला आतापर्यंत अपयश आल्यामुळे धरणग्रस्त बांधव संताप व्यक्त करू लागले आहेत.

वसाहत क्रमांक एक मधील जनतेला विहिरीला पंप बसवून पाणी खेचून जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असतो. विहीर हाच एकमेव पर्याय आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी विहिरीतील पाणीपातळी घटल्‍यामुळे धरणग्रस्तांनी पाणी पुरवठा खात्याच्या सांगे येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढून अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. त्यावेळी विहिरींची अधिक खोदाई करून पाणीसाठा वाढविण्यात आला होता. तसेच पंप नादुरुस्‍त झाल्यास पर्यायी व्यवस्था तयार ठेवण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक मोर्चा प्रसंगी आश्वासन दिले होते. त्यानंतर पाणीटंचाईचा प्रसंग कधी निर्माण झाला नव्‍हता.

तीनशेपेक्षा अधिक घरे
वसाहत क्रमांक एक मध्ये साधारणपणे तीनशे पेक्षा अधिक घरे असल्याने तात्पुरती सोय म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तरीही पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. वसाहती स्थापित केल्यास अडतीस वर्षे झाली, तरीही पाणी समस्या अद्याप सुटलेली नाही. त्‍यामुळे धरणग्रस्थांनी नाराजी व्‍यक्त केली आहे.

पर्यायी व्‍यवस्‍था करावी : उनंदकर
नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरला बसविण्यात आलेल्या पंपाद्वारे पाणी खेचून पाणी पुरविले जात आहे. अशीच घटना पुन्‍हा निर्माण होण्याची वेळ न पाहता पाणीपुरवठा खात्याने पर्यायी पंप बसविण्याची मागणी चंदन उनंदकर यांनी केली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास पाणीपुरवठा खात्यावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kala Academy Award Controversy: कला अकादमी सॉफ्ट टार्गेट! युगांक नायक यांच्या आक्षेपामुळे पुरस्कारावरुन वादंग; नाट्यस्पर्धेच्या नियमांमध्ये बदलाची गरज

Goa Milk Import: गोव्याची दूधाची तहान भागेना! रोज 2.60 लाख लिटर दुधाची आयात; 'कामधेनू' योजनेत सुधारणा करण्याची शेतकऱ्यांची मागणी

Goa Labour Report: गोव्यात रोजंदारीवरील कामगारांच्या संख्येत मोठी घट! 10 वर्षांत 40 हजार कामगार कमी झाले; कारखाने आणि बाष्पक खात्याच्या नोंदीतून उघड

New Labour Law: कामगारांना समान वेतन, डिजिटल पेमेंट! केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांची गोव्यात अंमलबजावणी होणार; मुख्यमंत्री सावंतांची घोषणा

Goa ZP Election: युती झाली, पण जागावाटप थांबले! झेडपी निवडणुकीत 'काँग्रेस-फॉरवर्ड-आरजीपी' एकत्र; आरक्षणाच्या निवाड्याकडे तिन्ही पक्षांचे लक्ष

SCROLL FOR NEXT