Goa Water Metro Dainik Gomantak
गोवा

Goa Water Metro: गोव्यातील 'वॉटर मेट्रो'ला मिळणार केंद्राचे सहकार्य, 25 ऑक्टोबरपूर्वी सर्वेक्षण

Goa Water Metro: राज्यातील ९० किलोमीटर जलमार्गावर नदी परिवहन खात्यातर्फे केंद्र सरकारच्या मदतीने ‘वॉटर मेट्रो’ सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

Sameer Amunekar

पणजी: राज्यातील ९० किलोमीटर जलमार्गावर नदी परिवहन खात्यातर्फे केंद्र सरकारच्या मदतीने ‘वॉटर मेट्रो’ सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी गोवा वॉटर मेट्रो प्रकल्पाला सहकार्य करण्याचे आश्वासन नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांना दिले आहे.

मंत्री सुभाष फळदेसाई आणि नदी परिवहनचे संचालक विक्रमसिंह राजेभोसले यांनी सोमवारी केरळमधील कोची वॉटर मेट्रो व्यवस्थापन लिमिटेडने सुरू केलेल्या वॉटर मेट्रोची पाहणी केली आणि रात्री उशिरा केंद्रीय मंत्री सोनवाल यांची त्यांनी भेट घेतली.

या भेटीत गोव्यातील जलमार्गासाठी असणाऱ्या नैसर्गीक स्रोत आणि पर्यटनाला त्याचा होणारा फायदा याविषयी फळदेसाई यांनी केंद्रीय मंत्र्यांना वॉटर मेट्रोची गरज पटवून दिली. २५ ऑक्टोबरपर्यंत केएमआरएलकडून गोव्यातील जलमार्गाची पाहणी होईल, त्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तत्पूर्वी कोचीमध्ये ‘वॉटर मेट्रो’ ही कोची मेट्रो रेल लिमिटेडने (केएमआरएल) सुरू केली आहे आणि तिला अल्पावधीत यश मिळाले आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्याने मंत्री फळदेसाई यांनी सोमवारी सकाळी कोची येथील ‘वॉटर मेट्रो’ची पाहणी केली आणि या मेट्रोची सर्व माहिती जाणून घेतली.

केएमआरएल व्यवस्थापकीय संचालक लोकनाथ बेहरा यांच्याशी गोव्यात अशाच प्रकारचे मॉडेल राबविण्याविषयी त्यांनी चर्चा केली. केंद्र सरकारने वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी गोव्याची निवड केली असल्याने त्याविषयी केरळ दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सोनोवाल यांच्याशी या उपक्रमावर चर्चा केली.

कोची वॉटर मेट्रो जी मेट्रो रेल्वे-शैलीच्या पायाभूत सुविधा आणि तिकीट प्रणालीसह इलेक्ट्रिक-हायब्रिड फेरी एकत्रित करते. तिचे यश किनारी राज्यांसाठी एक आदर्शवत आहे.

कोचीच्या धर्तीवर गोव्यात वॉटर मेट्रो

कोची ‘वॉटर मेट्रो’ ही दोन वर्षांपूर्वी सुरू झालेली देशातील पहिली सार्वजनिक जल वाहतूक व्यवस्था आहे.

त्या धर्तीवर गोव्यात विचाराधीन असलेल्या प्रस्तावित जलमार्गांमध्ये पणजी ते जुने गोवा, पणजी ते चोडण, वास्को ते कुठ्ठाळी आणि कळंगुट ते बागा ते कांदोळी या मार्गांचा समावेश असल्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT