Goa Water Metro Dainik Gomantak
गोवा

Water Metro Goa: गोव्यात ‘वॉटर मेट्रो’ होणार सुरू! तेरेखोल, मांडवीला हिरवा कंदील! शापोरा जलमार्गावर फुली

Goa Water Metro: गोवा दौऱ्यावर गेल्या आठवड्यात आलेल्या कोची मेट्रोच्या पथकाने राज्यातील चार नद्यांच्या पात्रांची पाहणी करून आपला प्राथमिक अहवाल तयार केला आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोवा दौऱ्यावर गेल्या आठवड्यात आलेल्या कोची मेट्रोच्या पथकाने राज्यातील चार नद्यांच्या पात्रांची पाहणी करून आपला प्राथमिक अहवाल तयार केला आहे.

त्यातून उत्तर गोव्यातील शापोरा नदीतील जलमार्गावर ‘वॉटर मेट्रो’ चालविणे तोट्याचे ठरेल असा निष्कर्ष काढीत शापोरा जलमार्ग वगळता उर्वरित तेरेखोल, मांडवी नदीतील जलमार्गांना पहिल्या टप्प्यात ‘वॉटर मेट्रो’ सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.

या पथकाच्या पाहणीनंतर आता ‘कोची मेट्रो’चेच दुसरे पथक येऊन ठरविलेल्या जलमार्गांवर ‘वॉटर मेट्रो’ सुरू करण्याची पाहणी करून प्राथमिक खर्च सरकारला सांगणार आहे, अशी माहिती नदी परिवहन खात्याचे संचालक विक्रमसिंह राजेभोसले यांनी ‘गोमन्तक’ला दिली. राज्यातील नद्यांचा वापर जलमार्गांसाठी अगोदरच होत आहे.

फेरीबोट सेवा या मार्गांवर चालत असल्याने केरळमध्ये सुरू झालेल्या पर्यटनाला फायदेशीर ठरलेली ‘वॉटर मेट्रो’ सेवा गोव्यातही सुरू करण्यासाठी नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पुढाकार घेतला आहे. अशी सेवा गोव्यात सुरू होणे आवश्यक असल्यानेच त्यांनी गेल्या महिन्यात कोची मेट्रोने सुरू केलेल्या ‘वॉटर मेट्रो’ची पाहणी केली होती. त्यानंतर केंद्रीय जलमार्ग मंत्र्यांचीही त्यांनी भेट घेतली होती.

या भेटीनंतर कोची मेट्रोचे पथक गेल्या आठवड्यात येथील जलमार्गांचा अभ्यास करण्यासाठी आले होते. त्यांनी मांडवी, तेरेखोल, शापोरा व झुआरी नदी जलपात्रांची पाहणी केली. त्यानंतर पहिल्या टप्प्यात मांडवी व तेरेखोल नदी जलपात्रांत ‘वॉटर मेट्रो’ सुरू केल्यास पर्यटनवाढीसाठी त्याचा फायदा होऊ शकतो, असे या पथकाने आपले निरीक्षण नोंदविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navratri Special: एका घराच्या गच्चीवर सुरु केलेले काम, पोचले हजारो मुलांपर्यंत! ‘रोबोटिक्स’ची ‘अ,आ,ई..’ शिकवणारी आधुनिक दुर्गा

Konkani Drama: कोकणी नाटक हे 'कोकणी' वाटलं पाहिजे! नाट्यस्पर्धेचं अर्धशतक

Coconut: गोमंतकीयांच्या खाद्यसंस्कृतीत महत्वाचे स्थान मिळवणारा, जीवनाचे झाड अर्थात माडावर येणारा बहुपयोगी 'नारळ'

Rama Kankonkar: ‘पुरावा नाही’, ‘साक्षीदार फिरले’ हेच पुन्हा ऐकावे लागणार का? 'जेनिटो' यावेळीही सुटणार का?

Butterfly Walk: ..पंख चिमुकले, निळेजांभळे! करमळी तळ्यावर फुलपाखरांचा उत्सव; बिग बटरफ्लाय मंथ सप्टेंबर

SCROLL FOR NEXT