Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Bethora Firing : बेतोड्यातील गोळीबार म्‍हणजे गोव्‍यातील ढासळत्‍या कायदा व सुव्‍यवस्‍थेचे प्रतिक- सरदेसाई

Vijai Sardesai On Bethora Firing: गोवाही गुन्‍हेगारीच्‍या मुख्‍य धारेत येत असल्‍याची चिन्‍हे

Ganeshprasad Gogate

Vijai Sardesai On Bethora Firing: बेतोडा येथे जो गोळीबार झाला ते पाहिल्‍यास आता गोवाही गुन्‍हेगारीच्‍या मुख्‍य धारेत येत आहे की काय अशी भीती वाटू लागली आहे.

गोव्‍यातील कायदा व सुव्‍यवस्‍था सुस्थितीत ठेवण्याऐवजी गृह खाते सांभाळणारे मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत मात्र भाजपच्‍या राष्‍ट्रीय प्रचारात मग्‍न आहेत.

त्‍यांना गोव्‍याकडे लक्ष देण्‍यासाठी वेळच राहिलेला नाही अशी टीका गाेवा फाॅरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केली.

काही दिवसांपूर्वी हरियानातील एका राजकीय नेत्‍याची हत्‍या केलेल्‍या दोन शार्प शूटर्सना हरियाना पोलिसांनी गोव्‍यात येऊन अटक केली हाेती.

याचा उल्‍लेख करत सरदेसाई म्‍हणाले, गाेवा हे गुन्‍हेगारांचे आश्रयघर झाले आहे आणि गोव्‍यात काहीही केले तरी चालते अशी गुन्‍हेगारांची समज झाली असावी.

यासाठीच हे गुन्‍हेगार गोव्‍यात येतात. त्‍यांना पाहिल्‍यावर गोव्‍यातील लोकांनाही आता आम्‍ही काहीही केले तरी चालते अशी भावना निर्माण झाली असावी असे उद्‍गार सरदेसाई यांनी काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"उद्या भारतासोबतही असं घडू शकतं..."; निकोलस मादुरोंच्या अपहरण प्रकरणावर काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य; सोशल मीडियावर पेटला वाद VIDEO

Kartik Aaryan: गोव्यातील सुट्ट्या अन् आता स्नॅपचॅट वाद! कार्तिक आर्यनच्या 'त्या' व्हायरल स्क्रीनशॉटने खळबळ; काय नेमकं प्रकरण?

मोपा विमानतळावरील वाहन प्रवेश शुल्कावरून 'GMR'ला शो-कॉज नोटीस; 7 दिवसांत मागितला खुलासा

Arpora Nightclub Fire: "सरपंचाला का बनवताय बळीचा बकरा?" बिर्च बाय रोमिओ दुर्घटनेबाबत सरदेसाईंचा रोखठोक सवाल; विधानसभेत उठवणार आवाज

दक्षिण गोव्यातील 4 तालुक्यांत दोन दिवस पाणी कपात! जलवाहिनीच्या दुरुस्तीला सुरुवात

SCROLL FOR NEXT