स्टेलर अकादमीतर्फे गौरव केलेल्या विद्यार्थ्यांसमवेत डॉ. शेखर साळकर, भास्कर नायक, डॉ. एस टी पुत्तुराजू, योगेंद्र सिंग सिकरकर. Dainik Gomantak
गोवा

Goa: विद्यार्थ्यांना पालकांना लाज वाटेल असे वर्तन करु नये

विद्यार्थ्यांनी योग्य निर्णय .योग्य़ वेळी घेणे आवश्यक आहे. शिक्षण (education) पुर्ण झाल्यावर ज्या व्यवसायामध्ये (Business) आपण कार्यरत असाल तेथे कुठल्याही परिस्थिती तोंड देण्याची क्षमता बाळगावी.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: सद्याच्या या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांसमोरील आव्हानामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक दिव्यातुन जावे लागते. मात्र हे सर्व करताना पालकांना लाज वाटेल असे वर्तन विद्यार्थ्यांनी करु नये असा सल्ला डॉ. शेखर साळकर (Dr. Shekhar Salkar) यांनी दिला. स्टेलर अकादमीने आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात ते सन्माननिय अतिथी म्हणुन उपस्थित होते. या सोहळ्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) प्रमुख पाहुणे म्हणुन येणार होते. मात्र शेवटपर्यंत ते सोहळ्यास पोहचू शकले नाहीत. या कार्यक्रमाला शिक्षणतज्ञ व उच्च शिक्षण संचालनालयाचे माजी संचालक भास्कर नायक (Bhaskar Nayak) उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी योग्य निर्णय .योग्य़ वेळी घेणे आवश्यक आहे. शिक्षण पुर्ण झाल्यावर ज्या व्यवसायामध्ये आपण कार्यरत असाल तेथे कुठल्याही परिस्थिती तोंड देण्याची क्षमता बाळगावी. जिवनात यश मिळवणे सोपे नसते. ते तात्काळ मिळत नाही त्यासाठी प्रयत्न व कामात प्रामाणिकता आवश्यक असते असेही डॉ. साळकर म्हणाले.

अभियांत्रिकी क्षत्रापेक्षा वैद्यकीय क्षेत्र जास्त संवेदनशील व महत्वाचे असल्याचे डॉ. साळकर यांनी सांगितले. वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर, नर्सीस यांना 24 तास काम करण्याची तयारी ठेवावी लागते असेही ते म्हणाले. वैद्यकीय क्षेत्रामध्ये संवाद कौशल्य गरजेचे आहे. डॉक्टर आपल्या रुग्णांकडे कसा बोलतो त्यावर रुग्ण आजारातुन लवकर मुक्त होत असतो असेही डॉ. साळकर म्हणाले.

पालकांनी आपल्या पाल्यांवर ट्युशनचा बोजा घालू नये असे आपले प्रामाणिक मत आहे. मात्र स्पर्धात्मक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन आवश्यक झाल्याचेही डॉ. साळकर यानी सांगितले.

स्टेलर अकादमी तर्फे 31 वैद्यकीय व 9 अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला. अकादमीचे संचालक योगेंद्र सिंग सिकरकर यानी सर्वांचे स्वागत केले. इस्टेलर शिक्षण ट्रस्टचे चेअरमन डॉ. एस टी पुत्तुराजू यानी सांगितले की स्टेलर अकादमीच्या शाखांमध्ये वाढ करण्याचे विचाराधीन आहे. विद्यार्थ्यांचा व पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे आम्हाला प्रशिक्षण पद्धतीत गोमंतकीय विद्यार्थ्यांना पुरक असे बदल करणे शक्य झाल्याचे डॉ. पुत्तुराजू यानी सांगितले.

या प्रसंगी काही विद्यार्थ्यांनी अकादमीतील आपल्या अनुभवाचे कथन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT