cm pramod sawant Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील भावी पशुवैद्यकांसाठी आनंदाची बातमी! कुर्टी येथील महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमाला केंद्राचा ग्रीन सिग्नल; मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

BVSc and AH Degree Course Goa: गोवा विद्यापीठाअंतर्गत कुर्टी-फोंडा येथे सुरू असलेल्या गोवा पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालयात बी. व्ही. एस्सी आणि ए. एच पदव्‍यांचा अभ्‍यासक्रम सुरू करण्‍यास केंद्र सरकारने मंजुरी दिली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: गोवा विद्यापीठाअंतर्गत कुर्टी-फोंडा येथे सुरू असलेल्या गोवा पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालयात बी. व्ही. एस्सी आणि ए. एच पदव्‍यांचा अभ्‍यासक्रम सुरू करण्‍यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ४० विद्यार्थ्यांच्‍या क्षमतेसह हे अभ्‍यासक्रम सुरू होणार असून, केंद्राच्‍या या निर्णयामुळे पशुवैद्यकीय शिक्षण घेत असलेल्‍या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मस्योद्योग, पशुपालन व पशुसंवर्धन मंत्रालयाचे संयुक्त आयुक्त विक्रमसिंह वशिष्‍ट यांनी यासंदर्भातील पत्र पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्‍याच्‍या सचिवांना पाठवले आहे. पशुवैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या राज्‍यातील विद्यार्थ्यांना बी. व्ही. एस्सी आणि ए. एच या पदव्‍या मिळवण्‍यासाठी शेजारील महाराष्‍ट्रात जावे लागत होते. त्‍यामुळे राज्‍यात या पदव्‍या सुरू करण्‍यासाठी मंजुरी मिळावी, अशी मागणी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही महिन्‍यांपूर्वी केंद्र सरकारकडे केलेली होती. त्‍यानुसार केंद्राने या पदव्‍या सुरू करण्‍यास मंजुरी दिली आहे.

या असतील अटी

१ खात्‍याने व्हीसीआय नियम, २०१७ आणि एमएसव्हीई विनियम २०१६ च्या सर्व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे

२ पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय खात्‍याच्‍या सचिवांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, महाविद्यालयाने प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी विहित नियमांनुसार नियमित शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी

३ पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुविधा, पशुवैद्यकीय क्लिनिकल कॉम्प्लेक्स, पशुधन फार्म कॉम्प्लेक्स, पशुधनाची संख्या, इतर शैक्षणिक आवश्यकतांबाबतीत आवश्यक मानके सर्वकाळ राखली जातील

४ कोणतीही कमतरता आढळल्यास किंवा वरील अटींचे पालन न केल्यास व्हीसीआय नियम, २०१७ च्या तरतुदींनुसार परवानगी

रद्द करण्यासह कारवाई होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut Prices: नारळाचे उत्पादन घटले, पण दर वाढलेले नाहीत! '50-60 रुपयांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

Nepal Flood: नदीचं खवळलेलं पाणी, पूल तुटण्याच्या मार्गावर... समोर मृत्यू दिसत असतानाही कुटुंबासाठी धावला 'बाप' Watch Video

Stray Cattle: शिवोलीत भटक्या गुरांचा उपद्रव वाढला; मुख्य रस्त्यावर ठाण, छोटे-मोठे अपघात नित्याचे, वाहनचालक त्रस्त

Goa Cashew: काजूच्या बागा वाढल्या, पण उत्पादन घटले! 7 वर्षांत तब्बल 3,683 टनांची घट; यंदा अवघी 65 टनांची वाढ

Goa Delhi Indigo Flight: मोठा अनर्थ टळला! उड्डाणानंतर इंडिगो विमानाचे इंजिन अचानक फेल; मोपा एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

SCROLL FOR NEXT