Velsao Railway Track Land Road Dispute  Dainik Gomantak
गोवा

Velsao: रस्त्याच्या दुसऱ्या बाजूलाही मातीचा भराव! वेळसाववासीय संतप्त; भूसंपादन न करता रेल्वेने काम सुरु केल्याचा दावा

Velsao Railway Track Road Dispute: वेळसांव येथील जमीन मालकीसंबंधी अर्ज प्रलंबित असतानाही रेल्वे विकास निगमने आपल्या कामाला पूर्णविराम दिला नाही.

Sameer Panditrao

Velsao Railway Track Land Road Dispute

वास्को: वेळसांव येथील जमीन मालकीसंबंधी अर्ज इन्स्पेक्टर ऑफ सर्व्हे अँड लँड रेकॉर्डस् अधिकारीणीकडे सुनावणीसाठी प्रलंबित असतानाही रेल्वे विकास निगमने आपल्या कामाला पूर्णविराम दिला नाही. दरम्यान, तेथील रस्त्याच्या दुसऱ्या बाजूलाही मातीचा भराव घातल्याने रहिवाशांच्या संतापात अधिक भर पडली आहे. खासदार कॅप्टन विरियतो फर्नांडिस यांना अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासनही हवेत विरले आहे.

वेळसांव येथे रेलमार्ग दुपदरीकरणाचे काम जोरात सुरु आहे. मात्र काही ठिकाणी भूसंपादन न करता रेल्वे विकास निगमने काम सुरु केल्याचा स्थानिकांचा दावा आहे. त्यामुळे वाद निर्माण होऊन तणावाचे वातावरण निर्माण होत असल्याने तेथे वेर्णा पोलिस तसेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे जवान तैनात केले आहेत.

या जमिनीवर रेल्वे जरी अधिकार सांगत असली तरी त्यासंबंधीचे कोणतेही कागदपत्रे संबंधित अधिकारी दाखवू शकत नाही. कामात अडथळे येत असल्याने रेल्वेने इन्स्पेक्टर ऑफ सर्व्हे अँड लँड रेकॉर्ड्स न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर १७ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

एलिना भेटल्या जिल्हाधिकाऱ्यांना

दोन दिवसांपूर्वी तेथील पारंपारिक रस्त्यावर मातीचा भराव घालून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला. तथापि नागरिकांनी तसेच माजी मंत्री एलिना साल्ढाणा, खासदार कॅप्टन फर्नांडिस तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध केल्यावर रेल्वेने एक पाऊल मागे घेतले होते व काम बंद ठेवले. परंतु गुरुवारी तेथील रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मातीचा भराव घालण्यात आल्याने लोक संतापले आहेत. एलिना साल्ढाणा यांनी येथे भेट देत रेल्वेच्या कारभारावर कठोर शब्दात टीका केली. त्यानंतर त्यांनी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेउन याबाबत माहिती दिली.

पंचायतीच्या नोटिशीकडे दुर्लक्ष

तेथील जमिनींचे भूसंपादन झालेले नसतानाही रेल्वे तेथे काम करीत आहे. हे काम बंद ठेवण्यासंबंधी पंचायतीने नोटीस देऊनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. रेल्वे स्थानिकांना ‘होम अरेस्ट’ करू पाहत आहे असा प्रश्न काँग्रेसचे ओलंसियो सिमोईस यांनी उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT