Vegetable Price In Goa Dainik Gomantak
गोवा

Vegetable Price In Goa: काही भाज्यांचे दर स्थिर तर काहींचे दर चढेच; गोव्यात 'असा' आहे बाजारभाव

Vegetable Price In Goa: गृहिणींना त्यांचं आर्थिक बजेट जुळवताना ओढाताण करावी लागतेय.

Ganeshprasad Gogate

Vegetable Price In Goa: गेल्या काही दिवसांपासून भाजीदरात चढ-उतार होताना दिसत आहेत. बदलते वातावरण, ख्रिसमस- नववर्ष या सारख्या इव्हेंट्समुळे पर्यटकांचा ओघ वाढत असून त्याचा परिणाम इथल्या स्थानिक बाजारपेठेवर होताना दिसून येतोय.

गेल्या आठवड्यात टोमॅटो व कांद्याचे दर वाढले होते, ते आता हळूहळू कमी होऊ लागले आहेत. टोमॅटो आणि कांद्याचा दर प्रत्येकी दहा रुपयांनी कमी झाला आहे. मात्र वालपापडी, सुरण, लसूण या भाज्या महागल्या आहेत.

आल्याचे दर स्थिर असून, 160 रुपये किलो तर कारल्याचा दरही स्थिर असून, 60 रुपये किलोने विक्री होत आहे.

  • बटाटा 40 रुपये किलो,

  • वांगी 60 रुपये किलो,

  • गाजर 60 रुपये किलो,

  • बीट 40 रुपये किलो,

  • शिमला मिरची 60 रुपये किलो

  • मिरची 80 रुपये किलो

  • तोंडली 60 रुपये किलो आहेत.

'या' भाज्या महागल्या:-

  • वालपापडी 80 रुपये किलो

  • सुरण 80 रुपये किलो

  • मेथी 50 रुपयाला दोन जुड्या

  • काकडी 40 रुपये किलो

  • मटार 80 रुपये किलो सहा दराने विक्री होत आहे.

या वाढत्या दरांमुळे साहजिकच गृहिणींना त्यांचं आर्थिक बजेट जुळवताना ओढाताण करावी लागणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT