Goa Vegetable Price Dainik Gomantak
गोवा

Goa Vegetable Price : बापरे! 10 रुपयांना एक लिंबू..!! भाज्यांसोबत लिंबाच्या दरातही वाढ; सर्वसामान्य मेटाकुटीला

Goa Vegetable Price: मानकुराद पाठोपाठ हापूस आंब्याची बाजारात एन्ट्री

Ganeshprasad Gogate

Goa Vegetable Price:

राज्यात मागील दोन आठवड्यापासून भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भाज्यांच्या दराचा भडका उडाला असून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला महागाईच्या रेट्यातून संसाराचा गाडा चालवणे कठीण होत आहे.

मागील आठवड्यात टोमॅटो 50 रुपये प्रती किलो दराने विकला जात होता, परंतु आता टोमॅटो दरात 10 रुपयांनी घट झाली आहे. परंतु लसूण 400 ते 450 रुपये प्रती किलो दराने विकली जात आहे.

आल्याचा दर प्रतिकिलो 150ते 200 रुपये झाला आहे. हिरवी मिरची, वालपापडी, भेंडी, तसेच पालेभाज्यांचे दर देखील वाढत आहेत.

लिंबाच्या दरातही वाढ:-

राज्यात रात्री काही प्रमाणात थंडी आणि दिवसा मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उष्म्यापासून गारवा मिळावा यासाठी लिंबूपाणी, लिंबू सरबाताचा नागरिक आसरा घेतात.

परंतु त्यांच्या दरातही वाढ झाली असून उत्तम दर्जाचे मध्यम आकाराचा लिंबू पाच रुपये प्रती नग विकला जातो. पणजी बाजारात मध्यम आकाराचे 50 रुपयांना दहा लिंबू विकले जात आहेत.

‘हापूस’ बाजारात दाखल: 1500 रूपये डझन

राज्यात मानकुराद आंब्याच्या पाठोपाठ हापूस आंबा देखील बाजारात दाखल झाला आहे. मानकुराद आंबा पणजी बाजारात 4 हजार ते 4500 रुपये प्रती डझन दराने विकला जात आहे तर हापूस आंबा 1500 रुपये डझन अशा दराने विकला जातोय.

आंबाशौकीन महाग असून देखील खरेदी करत असल्याचे विक्रेते सांगतात. अजून आंब्याचे पीक मोठ्या प्रमाणात येत नसल्याने आंब्याचे दर महाग असल्याचे सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: आठवडा विशेष: चंद्र राशीनुसार 'प्रेमसंबंध, आरोग्य आणि आर्थिक' स्थिती कशी राहील? सर्व 12 राशींचं भविष्य वाचा

Omkar Elephant: ओंकार हत्ती 'शांत'च! उपवनसंरक्षकांकडून 'अग्रेसिव्ह' चर्चांना पूर्णविराम, रेस्क्यूसाठी चार ठिकाणं निवडली

Gold Price: बाजारात महागाईचा तडाखा! सोन्याच्या दराने मोडले सर्व रेकॉर्ड; पहिल्यांदाच 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 30 हजाराच्या पार

'खराब रस्त्यांच्या दुरुस्तीची सुरू, 15 दिवसांत काणे पूर्ण होणार'; आपच्या निवेदनानंतर CM सावंतांची माहिती

CM प्रमोद सावंतांविरोधात बदनामीकारक व्हिडिओ करणाऱ्या गौरव बक्शीला 50,000 दंड; कोर्टासमोर मागितली माफी

SCROLL FOR NEXT