Vegetable  Dainik Gomantak
गोवा

Vegetable Farming in Goa: महाराष्ट्र, कर्नाटकावरील गोव्याचं अवलंबित्व कमी होणार, भाजीपाला लागवडीत वाढ; सासष्टी अग्रेसर!

Goan Farmers Vegetable Production: भाजीपाल्यासाठी गोव्याला शेजारील कर्नाटक आणि महाराष्ट्रावर अवलंबून राहावे लागते, परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा म्हणजेच २०२३-२४ वर्षात राज्यात भाजीपाला लागवडीत ३१५ हेक्टरने वाढ झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यात बागायती पिके, भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते परंतु गोव्यात भाजीपाल्याला जेवढी मागणी आहे त्या तुलनेत अतिशय तुरळक प्रमाणात भाजीपाला लागवड करण्यात येते. भाजीपाल्यासाठी गोव्याला शेजारील कर्नाटक आणि महाराष्ट्रावर अवलंबून राहावे लागते, परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा म्हणजेच २०२३-२४ वर्षात राज्यात भाजीपाला लागवडीत ३१५ हेक्टरने वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी (२०२२-२३) रब्बी आणि खरीब हंगाम धरून एकूण ८३७४ हेक्टर भाजी लागवड करण्यात आली होती. यंदा लागवडीत वाढ होऊन एकूण ८६८९ हेक्टर क्षेत्रफळात लागवड केली आहे. दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यात सर्वाधिक २६४५ हेक्टर क्षेत्रफळात भाजी लागवड होते. उत्तर गोव्यातील तिसवाडी तालुक्यात ९७६ हेक्टर क्षेत्रफळात भाजी लागवड होते. सर्वात कमी भाजी लागवड ही धारबांदोडा तालुक्यात १६२ हेक्टर क्षेत्रफळात होते.

सांगे तालुक्यात भाजीचे उत्पादन सर्वात कमी

राज्यातील भाजी लागवडीच्या उत्पादनाचा आढावा घेतल्यास राज्यात रब्बी आणि खरीप असे दोन्ही हंगाम मिळून एकूण ११४५३५ टन भाजीचे उत्पादन घेण्यात येते. सर्वाधिक भाजी लागवड ही सासष्टी तालुक्यात होत असल्याने साहजिकपणे उत्पादन देखील तेथेच अधिक आहे. सासष्टी (Salcete) तालुक्यात सर्वाधिक ३१३१८ टन उत्पादन घेण्यात येते. तर सर्वात कमी उत्पादन १९६० टन उत्पादन सांगे तालुक्यात आहे.

कोविड काळानंतर वाढ

कोविड काळानंतर गोव्यात (Goa) भाजीपाला उत्पादनात वाढ झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी तसेच युवकांनी आपल्या घरातील जागेत भाजीपाला पिकवण्यास सुरवात केली. राज्याच्या काही भागात इतर राज्यातून येणाऱ्या भाजीचे उत्पादनही घेण्याचे प्रयोगही यशस्वी झाले आहेत. त्यामुळे अनेकजण स्वयंपूर्ण शेतीकडे वळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravindra Jadeja ODI Career: रवींद्र जडेजाची वनडे कारकीर्द संपुष्टात? न्यूझीलंड मालिकेपूर्वी चेतेश्वर पुजाराच्या वक्तव्यानं क्रिकेट वर्तुळात खळबळ

Diwali Magazine Tradition: गोव्याच्या साहित्यविश्वाचा दिवाळी फराळ! जाणून घ्या दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा

Parliament Fight Video: संसद बनली कुस्तीचा आखाडा! सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी; लाथा-बुक्क्या अन् पाण्याच्या बाटल्यांनी हल्ला

Police Assault: कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले, टोळक्याने केला हल्ला; ऑन-ड्यूटी पोलिसाला किन्नरांकडून बेदम मारहाण

IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

SCROLL FOR NEXT