Mine Block Goa  Dainik Gomantak
गोवा

Vedanta Mine Goa: ‘वेदान्ता’कडून नवीन कंपनी स्‍थापन, शेअर बाजाराला दिली अधिकृत माहिती

Vedanta Mine Goa: वेदान्ताच्या म्हणण्यानुसार लोह खनिज व पोलाद व्यवसाय ही नवी कंपनी हाताळणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Vedanta Mine Goa: राज्यात खाणपट्ट्यांचे लिलाव जिंकल्यानंतर वेदान्ता कंपनीने आता खाणकामासाठी आणखी एक कंपनी स्थापन केली आहे.

याची माहिती आज त्यांनी अधिकृतपणे शेअर बाजाराला दिली. ‘सेझा आयर्न ॲण्ड स्टील लिमिटेड’ असे या नव्या कंपनीचे नाव आहे. त्या कंपनीच्या माध्यमातूनच यापुढे आता खाणकाम केले जाणार आहे.

‘सेझा गोवा आयर्न ओर’ ही कंपनी सगळ्यांनाच ठाऊक आहे. गेली कित्येक वर्षे ती कंपनी खाणव्यवसायात आहे.

त्या कंपनीची मालकी सध्या वेदान्ताकडे आहे. याच कंपनीने ही नवी कंपनी शेअर बाजारात नोंदणीकृत केली आहे.

खाणव्यवसायात अनेक बड्या कंपन्या येऊ पाहत आहेत. त्यामुळे छोट्या कंपन्यांकडून या मोठ्या कंपन्या व्यवसाय आपल्याकडे घेऊ शकतात.

हे सुकर होण्यासाठी नव्या कंपन्या स्थापन केल्या जातील अशी चर्चा विधानसभा अधिवेशनात झाली होती.

विधानसभेत उपस्‍थित झाला होता मुद्दा

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडला होता. सरकारला खाण कंपन्यांकडून कर चुकवेगिरीतून कोट्यवधी रुपये येणे आहेत.

ते देणे चुकविण्यासाठीच नव्या कंपन्या स्थापन करून त्यांच्या नावे व्यवसाय मिळवायचा आणि परस्पर बड्या कंपन्यांना तो विकून टाकायचा असे प्रकार घडू शकतात अशी शक्यता त्यांनी वर्तविली होती. आज ती खरी ठरली आहे.

एक बिलियन अमेरिकी डॉलर्सची तांब्याच्या खाणीत केली गुंतवणूक

वेदान्ताच्या म्हणण्यानुसार लोह खनिज व पोलाद व्यवसाय ही नवी कंपनी हाताळणार आहे. खाणकाम, खनिजावर प्रक्रिया आदी कामे वेदान्ताकडून केली जातात.

या कंपनीची मालकी असलेल्या ‘वेदान्ता रिसोर्सेस’ या कंपनीला झांबियातील तांब्याच्या खाणीचा ताबा मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी या नव्या कंपनीची घोषणा करण्यात आली आहे.

या तांब्याच्या खाणीत एक बिलियन अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक ही कंपनी झांबियामध्‍ये करणार आहे. तेथील तांबे भारतीय बाजारात औद्योगिक वापरासाठी आणण्याची कंपनीची योजना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT