Vasco Cylinder Blast case Dainik Gomantak
गोवा

Vasco Cylinder Blast case: सिलिंडरच्‍या स्‍फोटात माय-लेक ठार

Vasco Cylinder Blast वास्‍को हळहळले : दूध आणायला गेली अन्‌ झाला घात; 5 महिन्‍यांच्‍या गर्भवतीवर घाला

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco Cylinder Blast नवेवाडे-वास्‍को येथील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये आज शनिवारी सकाळी गॅस सिलिंडरचा स्‍फोट होऊन दोन महिला जागीच ठार झाल्‍या. शिवानी अनुरागसिंग राजावत (26) व त्‍यांची आई जयदेवी चव्हाण (50, मूळ ग्वाल्हेर-मध्यप्रदेश) अशी मृतांची नावे आहेत.

विशेष म्‍हणजे शिवानी या पाच महिन्‍यांच्‍या गर्भवती होत्‍या. ही घटना सकाळी पावणेनऊच्‍या सुमारास घडली. जयदेवी या दुधाची पिशवी आणायला खाली दुकानात गेल्‍या आणि चुकून गॅस सुरूच राहून गळती झाली असावी. आल्‍यानंतर त्‍यांनी गॅस सुरू करण्‍यासाठी लायटरचा वापर केला आणि स्‍फोट झाला असावा असा अंदाज आहे.

नवेवाडे येथील श्री जय संतोषी माता मंदिरासमोर असलेल्या ‘नील पार्वती’ इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शिवानी राजावत ही महिला तिचा नवरा आणि आईसोबत राहत होती. पाच महिन्यांपूर्वीच हे कुटुंब येथे राहायला आले होते. शिवानी या आज आपल्या आईसोबत घरी जाणार होत्‍या.

त्‍यांनी सामानाची आवराआवर केली होती. पती अनुराग राजावत (२४) नौदलात कामाला असून काल शुक्रवारी रात्री ते कामावर गेले होते. शिवानीचा पती सकाळी कामावरून परतण्यापूर्वी ही घटना घडली.

तो कामावरून परल्‍यानंतर त्याने पत्नी आणि सासू मृतावस्थेत पडल्याचे पाहिले. त्‍यामुळे आपल्‍याला मोठा मानसिक धक्का बसला असे त्‍याने पोलिसांना सांगितले. या घटनेनंतर ते काही वेळ बेशुद्ध झाले. यावेळी नौदलाच्‍या त्‍यांच्‍या सहकाऱ्यांनी त्‍यांना तेथून इस्‍पितळात घेऊन गेले.

पोलिसांनी पंचनामा करून शिवानी आणि जयदेवी यांचे मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी इस्‍पितळात पाठवून दिले. वास्‍कोचे पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT