FIR registered Dainik Gomantak
गोवा

Fr Bolmax Pereira: वास्कोत तणाव कायम; विरिएतो यांचे वादाचे षड््यंत्र

माफी मागावी; रमाकांत बोरकर यांची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Controversial statement about Shivaji Maharaj  वास्को चिखली चर्चमधील मुख्य फादर बोलमॅक्स परेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या मतांमुळे राज्यातील शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप उसळला आहे. त्यामुळे फादर परेरा यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असून यावर सोमवारी (ता.७) मडगाव न्यायालयात सुनावणी होणार आहे.

तथापि, या प्रकरणात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी आणि फादर फर्नांडिस यांना समर्थन देऊन नवी आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल कॅप्टन विरिएतो फर्नांडिस यांनी सर्व गोमंतकीयांची माफी मागावी, अशी मागणी माजी सरपंच रमाकांत बोरकर यांनी केली आहे.

याप्रकरणी परेरा यांनी शिवप्रेमी व हिंदू संघटनांची जाहीररित्या माफी मागितली आहे. तरीही आगीत तेल घालण्यासारखे वक्तव्य कॅप्टन फर्नांडिस यांनी केले आहे.

त्यांनी फादर परेरा यांना पाठिंबा दर्शवून त्यांनी केलेल्या कृत्याचे एकप्रकारे समर्थन केले आहे, असे सांकवाळचे माजी सरपंच रमाकांत बोरकर यांनी सांगितले.

यामुळे राज्यात पुन्हा एकदा वाद निर्माण करण्याचे षडयंत्र कॅ. फर्नांडिस यांनी रचले आहे, असे बोरकर म्हणाले.

चिखली चर्चसमोर लोकांना रात्रीच्या वेळी बोलावून, आम्ही सर्वजण फादर परेरा यांच्यासोबत असल्याचे जाहीररित्या बोलून फर्नांडिस यांनी त्यांना पाठिंबा दर्शविला.

त्यामुळे कॅ. फर्नांडिस यांनी शांत झालेले प्रकरण पुन्हा एकदा चिघळवून राज्यातील शिवप्रेमींचा अपमान केला असून तो मोठ्या षड्यंत्राचा भाग असावा, अशी शंका बोरकर यांनी व्यक्त केली.

...तर गोव्याचे मणिपूर होईल

जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण झाल्यामुळे मणिपुरात हिंसाचार उसळला आहे, अशीच परिस्थिती गोव्यातही होण्याची शक्यता चर्च संस्थेने व्यक्त केली आहे. ती होऊ नये, यासाठी राज्य सरकारने योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही म्हटले आहे.

अर्थात अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी चर्च संस्थेच्या संबंधित व्यक्तींना योग्य ते ताकीद द्यावी, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT