Valpoi News: दुर्दैवी ! 'त्या' गायीच्या मृत्यूचे कारण उलगडताच डॉक्टरही अवाक; पोटातून तब्बल 30 किलो...

वाळपईतील घटना, प्लास्टिक कचऱ्याची समस्या गंभीर
Valpoi News
Valpoi NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Valpoi News वाळपई शहरात मोकाट गुरांना खाण्यासाठी काही मिळत नसल्याने रस्त्यावर किंवा कचराकुंडीत मिळेल ते खाऊन ती आपले पोट भरताना दिसतात. परिणामी काल प्लास्टिक कचरा खाऊन एका गायीचा मृत्यू झाला.

पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांना या मृत गायीच्या पोटात चक्क ३० किलो प्लास्टिक सापडले. गेल्या आठवड्यात वाळपई शहरात एक मोकाट गाय आजारी पडण्याची घटना घडली. यावेळी त्या गायीला वाळपई - नाणूस येथील गोशाळेत नेण्यात आले, परंतु काल उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.

या गायीच्या मृत्यूचे कारण शोधताना नाणूस गोशाळेचे पशू वैद्यकीय अधिकारी डाॅ. रघुनाथ धुरी व त्यांचे साहाय्यक सोहन पार्सेकर यांनी तपासणी केली असता त्या गायीच्या पोटात ३० किलो प्लास्टिक कचरा आढळून आला.

Valpoi News
Vasco Murder Case: पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून, संशयित पोलिसांच्या ताब्यात

मोकाट गुरांना वाली कोण?

वाळपई भागात मोकाट गुरांना वाली कोण असा सवाल उपस्थित होत आहे. कारण ही भटकी गुरे अपघातांनाही कारणीभूत ठरत आहेत. मालक आपल्या गुरांना मोकाट सोडतात.

त्यामुळे ती मिळेल ते खाऊन आपले पोट भरतात, परिणामी त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागते. यासाठी मालकांनी आपल्या गुरांची काळजी घेणे गरजेचे आहे. हा विषय गंभीर असून प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे

Valpoi News
Goa Monsoon Update: दिलासादायक! पावसाचे इंचांचे 'शतक' पूर्ण

वाळपई काल एका गायीचा मृत्यू प्लास्टिक खाल्ल्याने झाला ही दुर्दैवी घटना आहे. वाळपई शहरात मोकाट गुरे मोठ्या प्रमाणात फिरत आहेत व त्यांना खाण्यासाठी काही मिळत नसल्याने ती कचरा खातात. सर्वांनी गोमातेचे रक्षण करणे आवश्यक आहे.

- हनुमंत परब, अध्यक्ष, नाणूस गोशाळा

Valpoi News
GPSC Exam: लोकसेवा आयोग परीक्षेबाबत महत्वाची बातमी, भरती प्रक्रियेत बदल होण्याचे संकेत

वाळपई शहरात घरोघरी कचरा गोळा करण्याचे काम आम्ही नियमित करतो, तरीही काहीजण प्लास्टिकचा वापर करत आहेत. नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा व मालकांनी आपली गुरे रस्त्यावर सोडण्याऐवजी त्यांची काळजी घ्यावी.

- शेहजीन शेख, नगराध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com