Vasco Civil Supplies Department Dainik Gomantak
गोवा

Goa: वास्को नागरी पुरवठा खात्याच कार्यालय जलमय

वास्को नागरी पुरवठा खात्याच्या कार्यालयात (Vasco Civil Supplies Department) पावसाचे पाणीच पाणी.

दैनिक गोमन्तक

वास्को नागरी पुरवठा खात्याच्या कार्यालयात (Vasco Civil Supplies Department) पावसाचे पाणीच पाणी. कर्मचाऱ्यांचा कार्यालयात भरत असलेले पाणी काढण्यातच वेळ जातो. तर लोकांना पाण्यात उभे राहून आपली कामे करून घ्यावी लागतात.

येथील पालिका इमारतीत असलेले नागरी पुरवठा खात्याच्या कार्यालयाला पावसाच्या पाण्याची गळती लागली असून, त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांची पाणी काढून काढून घालमेल झाली आहे. तसेच या कार्यालयात आपल्या वैयक्तिक कामासाठी येणाऱ्या नागरिकांना पाण्यात उभे राहून आपले काम करून घ्यावे लागते. या कार्यालयातील कर्मचारी अक्षरशा या पाण्यात राहून नागरिकांची कामे करताना दिसतात. तसेच कार्यालयीन कामकाजाच्या फाइल्स उघड्यावर असल्याने त्या गहाळ होण्याच्या मार्गावर आहे. सध्या या इमारतीचे नूतनीकरणाचे काम चालू असून वरील मजला झाकला नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

दरम्यान नागरी पुरवठा कार्यालयासाठी नवीन जागा पाहण्याच्या हालचाली सुरू असून अजून त्यांना जागा मिळाली नसल्याने त्यांना या अडगळीच्या जागेत काम करावे लागत आहे. पंधरा दिवसापूर्वी हीच परिस्थिती होती. तेव्हा सदर बातमी वर्तमानपत्रात झळकताच नागरी पुरवठा खात्याचे संचालकांनी या ठिकाणी भेट देऊन पहाणी केली होती. तसेच त्याने यावेळी मुख्याधिकाऱ्यांचीही भेट घेतली होती. मात्र अजून त्यांना कार्यालय मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच कार्यालयीन संगणक व इतर वस्तूंची या पावसाच्या पाण्यामुळे वाताहात होण्याच्या स्थितीमध्ये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

China Artificial Sun: चीन बनवणार 'आर्टिफिशियल सन'! सूर्यासारखी धगधगती ऊर्जा मुठीत; सुपरकंडक्टिंग मॅग्नेट टेस्ट यशस्वी

Youth Protest: भाजपची पोपटपंची चाललीच नाही! 'हिंदू-मुस्लिम'च्या सापळ्यात न अडकता तरुणाईचा व्यवस्थेविरुद्ध थेट एल्गार

Pakistan-Afghanistan Conflict: पाक-अफगाण सीमेवर रक्तपात! हवाई हल्ले अन् चकमकीत 500 अफगाण नागरिकांचा मृत्यू; युनायटेड नेशन्सचा धक्कादायक रिपोर्ट

Japan Earthquake: जपानमध्ये 7.1 तीव्रतेचा भूकंप! समुद्रात उसळल्या महाकाय लाटा; त्सुनामीच्या अलर्टने नागरिकांमध्ये घबराट VIDEO

Morjim CRZ Demolition: मोरजीतील भूमिपुत्रांच्या वेदना कायम! तेमवाड्यातील बांधकामांवर 6व्या दिवशीही हातोडा

SCROLL FOR NEXT