Money Dainik Gomantak
गोवा

Vasco ATM Scam: एटीएममध्ये पैसे भरणारेच निघाले चोर! खासगी कंपनीच्या 5 कर्मचाऱ्यांनी लंपास केले 14 लाख; वास्कोतील धक्कादायक प्रकाराने खळबळ

Financial Crime In Goa: एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या एका खासगी कंपनीच्या पाच कर्मचाऱ्यांनी मिळून जवळजवळ 14 लाख रुपये लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार वास्को शहरात उघडकीस आला.

Manish Jadhav

वास्को: एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या एका खासगी कंपनीच्या पाच कर्मचाऱ्यांनी मिळून जवळजवळ 14 लाख रुपये (13,97,500) लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार वास्को शहरात उघडकीस आला. या प्रकरणी वास्को पोलिसांनी पाचही आरोपी कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे.

नेमकं प्रकरण काय?

पर्वरी येथील Hitachi Cash Management Service Pvt. Ltd. या खासगी कंपनीकडे विविध बँकांच्या एटीएममध्ये रोकड भरण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. या कंपनीकडे वास्कोतील ICICI बँकेच्याही एटीएममध्ये पैसे भरण्याची जबाबदारी होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या सुमारे एका महिन्याच्या काळात या कर्मचाऱ्यांनी वास्को (Vasco) येथील ICICI बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरताना 13 लाख 97 हजार 500 रुपये (जवळपास 14 लाख रुपये) कमी भरले किंवा ते स्वतःसाठी काढून घेतले. थोडक्यात, त्यांनी त्यांच्यावर सोपवलेल्या पैशांचा गैरवापर केला.

हा प्रकार तेव्हा उघडकीस आला, जेव्हा कंपनीने एटीएममधील (ATM) रोकड आणि जमा केलेले आकडे तपासले. यामध्ये मोठी तफावत आढळल्यानंतर कंपनीला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वास्को पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

कोणावर गुन्हा दाखल?

या फसवणुकीत सामील असलेल्या Hitachi कंपनीच्या पाचही कर्मचाऱ्यांची नावे समोर आली आहेत. हे सर्व जण एटीएम ऑपरेटर म्हणून काम करत होते आणि एटीएममध्ये पैसे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे गोपीनाथ हरमलकर, समीर कदम, अर्जुन धाईंजे, केतन खरात, संकेत श्रीष्णा घोगाळे अशी आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या कर्मचाऱ्यांवर पैशाच्या सुरक्षिततेची जबाबदारी देण्यात आली होती, पण त्यांनी कंपनीचा विश्वासघात केला. या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी वास्को पोलीस स्टेशनमध्ये कठोर कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला. भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या विविध कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस तपास सुरु

पोलीस उपनिरीक्षक (PSI) प्लॅटो कार्व्हाल्हो हे आता या पाचही कर्मचाऱ्यांनी 14 लाख रुपयांची अफरातफर नेमकी कशी केली, हे पैसे त्यांनी कुठे खर्च केले किंवा त्यांच्यासोबत आणखी कोणी सामील आहे का, याचा सखोल तपास करत आहेत.

एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यांकडूनच एवढ्या मोठ्या रकमेचा गैरव्यवहार झाल्यामुळे, बँकिंग व्यवस्थेतील सुरक्षेवर आणि खासगी कंत्राटी कंपन्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांच्या तपासातून लवकरच या घोटाळ्याचे सत्य समोर येईल, अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tiger Symbolism: वाघाच्या पुढच्या 2 पायांमध्ये रानडुक्कर, तर मध्ये छोटेखानी सिंह; वागऱ्यागाळ येथील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती

Vaibhav Suryavanshi Century: 15 षटकार 11 चौकार...! 32 चेंडूत शतक ठोकत रचला इतिहास, कतारमध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचं वादळ VIDEO

Viral Video: भर रस्त्यात काकाची 'दारु पार्टी'! कुणाचीही हटवण्याची हिंमत नाही, व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले, "काका ऑन रॉक"

VIDEO: बुमराहच्या तोंडून निघाली शिवी, बावुमाच्या उंचीवर केलेलं वक्तव्य व्हायरल; म्हणाला, 'बौना भी तो है यह...'

Bihar Election Result Memes: नेहरुंच्या वाढदिवसापासून 'पंचायत'मधील डान्सपर्यंत...! बिहार निकालावर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस VIDEO

SCROLL FOR NEXT