Valpoi Municipality Dainik Gomantak
गोवा

Goa Municipality: नगरपालिकेच्या भर सभामंडपात नीलेश काब्रालांनी घेतले अधिकाऱ्यांना फैलावर

Goa Municipality: मंत्री काब्राल यांनी खात्याचे अभियंते, अधिकारीवर्गाला तातडीने कामे करण्याचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Municipality: वाळपई येथे नगरपालिका सभामंडपात काल सकाळी 10.30 वाजता सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल (Nilesh Cabral) यांनी सत्तरी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य व वाळपईचे नगराध्यक्ष, नगरसेवक व नागरिक यांच्याशी चर्चा करून विविध समस्या जाणून घेतल्या.

दरम्यान, यावेळी मंत्री काब्राल यांनी खात्याचे अभियंते, अधिकारीवर्गावर बरेच संतापले व तातडीने कामे करण्याचे आदेश दिले. यावेळी पंच सदस्यांनी अधिकारी, कर्मचारी कामाविषयी व्यवस्थित कार्यवाही करीत नाहीत, अशी तक्रार केली. त्यावर काब्राल यांनी अभियंते, अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले व अभियंते जर चुकीची माहिती देत असतील, तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल असा कडक इशारा दिला.

‘मंत्री तुमच्या दारी’ या संकल्पनेंतर्गत सत्तरी तालुक्यातील पर्ये व वाळपई मतदारसंघातील लोकप्रतिनिधींशी, लोकांशी हितगूज मंत्र्यांनी केले. यावेळी पर्येच्या आमदार दिव्या राणे, वाळपई नगराध्यक्ष शेहझीन शेख, उपजिल्हाधिकारी प्रवीण परब, मामलेदार दशरथ गावस, गटविकास अधिकारी सूर्याजीराव राणे, नगरगाव जिल्हा पंचायत सदस्य राजश्री काळे, होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, केरी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे महेश पाटील आदी उपस्थित होते.

काब्राल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील इमारत, रस्ते तसेच पर्यावरण, पाणीपुरवठा यांच्या समस्या जाणून घेतल्या. ते म्हणाले, पुढील अडीच वर्षात सरकार घरोघरी सुरळीत पाणी पुरविण्यासाठी कार्यरत राहणार आहे.

पाणी समस्या सुटण्यासाठी गावात लहान टाक्यांसाठी लोकांनी जागा द्याव्या. जेणेकरून लोकांना नियमित पाणी उपलब्ध करता येईल. बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी आपली कामे चोख करावी. लोकांना वेळीच सेवा, विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी नियमित लक्ष ठेवून पाठपुरावा करावा.

मंत्र्यांना समस्यांचे निवेदन सादर

यावेळी नगरगाव, सावर्डे, खोतोडा, गुळेली, भिरोंडा, पिसुर्ले, होंडा, केरी, पर्ये, मोर्ले, म्हाऊस, डोंगुर्ली ठाणे या ग्रामपंचायती व वाळपई पालिका मंडळ, उसगाव गांजे ग्रामपंचायतींचे सरपंच, पंच सदस्य यांची उपस्थिती होती. सर्वांनी आपापल्या परिसरात भेडसावत असलेल्या पुलांची गरज, मुख्य अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, इमारतींची दुरुस्ती आदी समस्यांचे निवेदन मंत्री काब्राल यांना दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT