Goa Road Guide Line Dainik Gomantak
गोवा

Goa Road Guide Line: सावर्शेतील रस्त्यांवर सूचना फलक हवेत!

Goa Road Guide Line: दिशादर्शक फलक नसल्याने ह्या रस्त्यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Road Guide Line: वाळपई नगरपालिका क्षेत्रातील हातवाडा ते वाळपई - सावर्शे रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्याने ह्या रस्त्यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे. वाळपई फोंडा मार्ग ह्या रस्त्यावर रोज हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. मात्र हातवाडा जॅक्सनवर फोंडा असे लिहिलेला दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालकांना अडचण येत आहे, ही अडचण दूर करण्यासाठी संबंधितांनी त्वरित दिशादर्शक फलक लावावे, अशी वाहन चालकांची मागणी आहे.

वाळपई-सावर्शे हा मार्ग प्रवासासाठी एकमेव मार्ग असून तांबडीसुर्ला, बोंडला अभियारण्याकडेजाण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. पण रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्याने येणाऱ्या पर्यटकांची तारांबळ उडते. गोंधळलेल्या स्थिती पर्यटक कुठेही भरकटतात, असे स्थानिकांनी सांगितले.

तसेच, याबाबत आसीन उस्ताद म्हणाले, आम्ही या गावचे रहिवासी असून रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्याने येणाऱ्या पर्यटकांची दररोज गैरसोय होते आहे. अनेक वेळा प्रवासी रस्त्यावर थांबून स्थानिकांना रस्ता कुठून जातो, याबद्दल विचारतात. रात्रीच्या वेळी कुठे जायचे, ही मोठी समस्या निर्माण होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT