Valpoi Market  Dainik Gomantak
गोवा

Goa Market: वाळपई बाजाराला स्थैर्य, पण वाढत्या व्यापाऱ्यांमुळे उद्‍भवताय अनेक अडचणी!

Goa Market: वाळपईचा आठवडा बाजारात विक्रेत्यांची संख्या वाढत असल्याने ताण वाढला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Market: वाळपईचा मंगळवारचा आठवडी बाजार शहर तसेच ग्रामीण भागासाठी फायद्याचा ठरत आहे. पूर्वी तो मासोर्डे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरत होता. पण दहा वर्षापासून मासोर्डे मार्गावर केवळ कपडे, चप्पल, बँग विकणाऱ्यांना तर फळे, भाजी व्यापाऱ्यांना वाळपई पालिका मैदानाच्या ठाणे मार्गावरील रस्त्यालगत बसवून बाजारचे विभाजन केल्याने बाजाराला स्थैर्य आले आहे. पण तरीही बाजारातील वाढत्या व्यापाऱ्यांमुळे उद्‍भवणाऱ्या समस्यांमुळे स्वतंत्र बाजार संकुलाचा विचार व्हावा,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आठवडा बाजारात विक्रेत्यांची संख्या वाढत असल्याने ताण वाढला आहे. ताडपत्रीच्या आधारावर गटारांवरील लाद्यांवर विक्रेते बसत आहेत. कर्नाटक, महाराष्ट्रातून विक्रेते वाळपईत मंगळवारी दाखल होतात. पूर्वी 50 ते 60 विक्रेते येत होते, ती संख्या दोनशेवर पोहचली आहे.

संकुलाचा प्रस्ताव 4 वर्षे रखडला !

बाजार भरलेला असताना मधूनच दुचाकी नेल्या जातात. तसेच भटक्या गुरांचाही संचार बाजारपेठेत असतो. त्याचा व्यापाऱ्यांना त्रास होतो. यावर उपाय म्हणून वाळपई आठवडी बाजाराला नवे रूप देण्याची गरज आहे.

वाळपई पालिकेने डिसेंबर 2018 मध्ये मासोर्डे मार्गावर एका जागेची पहाणी करून तिथे नवीन बाजार संकुलाच्या हालचाली केल्या, पण नंतर कार्यवाही झाली नाही. सरकारी अनास्थेमुळे ती प्रक्रिया रखडली.

...तर विक्रेत्यांना सुविधाही मिळतील!

आठवडा बाजार सुसज्ज अशा जागेत होऊ लागला तर वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. बाजारात मुख्यत: शौचालय व पाण्याची सोय गरजेची आहे. मासोर्डे मार्गावर बाजार संकूल प्रकल्प जर प्रत्यक्षात उतरला तर विक्रेत्यांना मुलभूत सुविधा पुरवता येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT