Mubarak Ali Khan House Dainik Gomantak
गोवा

Valpoi: बेकायदेशीर बांधकाम पाडण्यासाठी पालिका कर्मचारी आले, मात्र घरमालकाच्या 'या' वचनामुळे माघारी फिरले, वाचा नक्की काय घडलं

Valpoi: वाळपईत अवैध बांधकामाच्या विरोधात नगरपालिकेची कठोर पावले

Ganeshprasad Gogate

Municipality takes strict action against illegal construction in Valpoi:

राज्यातील बेकायदेशीर बांधकामासंबंधी सरकार अलर्टमोडवर असून काही आठवड्यांपूर्वी वागातोर किनाऱ्यालगतच्या बेकायदेशीर बांधकामावर सरकारने हातोडा चालवला होता.

अशाच प्रकारचे एक प्रकरण समोर येत असून वाळपई नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 9 मधील म्हाऊस मार्गावरील मुबारक अली खान यांच्या बेकायदेशीररीत्या बांधलेल्या बंगल्यावर आज सोमवारी वाळपई नगरपालिकेने धडक कारवाई केल्याची माहिती समोर येतेय.

मुबारक अली खान यांनी बेकायदेशीरपणे बांधलेल्या बंगल्यावर पालिका कर्मचाऱ्यांनी हातोडा उगारला. यावेळी सकाळ पासून मोठ्या प्रमाणात घराशेजारी पोलिस बंदोबस्त तैनात होता.

मात्र सदर घर मालकाने दोन दिवसाच्या आत घर खाली करून घर पाडण्याचे वचन दिल्याने पालिकेने या प्रकरणी माघार घेतली आहे.

माणुसकीच्या नात्याने आम्ही दोन दिवसांचा अवधी देत आहोत, मात्र निर्धारित वेळेत जर का घर खाली केले नाही तर गुरुवारी सकाळी कायदेशीररित्या घर पाडण्यात येईल असा इशारा पालिकेने खान यांना दिला आहे.

Police Force

गेल्या एक वर्षापासून चर्चेत आहे.

मुबारक अली खान यांच्या विरुद्ध 2017 मध्ये अमीना बी शेख, शमसुद्दीनीशा खान, बद्रुनीशा खान, आफताब खान आदींनी बेकायदेशीर बांधकामाविरुध्द न्यायालयात धाव घेतली होती.

त्यानुसार 2017 पासुन मुबारक अली खान यांच्या विरुद्ध खटला सुरु झाला होता. त्यानंतर हा खटला नगर नियोजन खात्याकडे गेला.

2018 मध्ये न्यायालयाने जलद गतीने काम करत घर पाडण्याचे आदेश दिले होते मात्र हा खटला उच्च न्यायालयात गेल्याने घर पाडण्यास स्थगिती मिळाली होती.

मात्र आता उच्च न्यायालयाकडून देखील बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आल्याने अखेर खान यांच्या घराबवर हातोडा पडणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फाळणीपूर्वी पाकिस्तानला गेले, 1981 मध्ये पुन्हा गोव्यात आले; 44 वर्षाच्या संघर्षानंतर मिळाले भारतीय नागरिकत्व

Panajim: सहा दिवस उलटले, मांडवीत बुडालेली बोट काढण्यासाठी अजूनही हालचाली नाही

New IPO: 200 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट; गोव्यातील 'मोलबायो डायगनोस्टीक' कंपनीचा लवकरच येणार आयपीओ

Goa Politics: प्रचंड बहुमत असूनही नाराजीचा सूर वाढतोय, 2027ची निवडणूक 'भाजप'साठी ठरणार कठीण कसोटी

रविंच्या 'फ्री हँड' फॉर्म्युल्यामुळे गुन्हेगार थरथर कापत होते; आज मात्र कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT