Goa Traffic Police Dainik Gomantak
गोवा

Vagator Accident Case: हणजूण पोलिसांचा 'तळीरामांना' इशारा; गोव्यात या, पर्यटनाचा आनंद घ्या, मात्र...

Goa Traffic Police: वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलीस अलर्ट मोडवर असून सणासुदीच्या काळात अपघात रोखण्यासाठी पोलीस पथक कसोशीने प्रयत्न करत आहे

Ganeshprasad Gogate

Goa Traffic Police: दोन दिवसांपूर्वी झालेल्या वागातोर येथील अपघातानंतर रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलीस अलर्ट मोडवर असून सणासुदीच्या काळात अपघात रोखण्यासाठी पोलीस पथक कसोशीने प्रयत्न करत आहे.

त्यातच आता हणजूण ट्राफिक पोलिसांनी गोव्यात येणाऱ्या सर्व पर्यटकांना अपघात टाळण्यासाठी आवाहन वजा इशारा दिलाय. यासंबंधी वाहतूक पोलीस गौरीश परब यांनी गोमंतकसोबत संवाद साधला.

गोव्यात फिरताना मद्यपान करून वाहन चालवणे हा गुन्हा आहे. मोटार वाहन नियम आणि कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनीआखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तींना त्यांच्या कृतीचे परिणाम भोगावे लागतील, तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध खटले दाखल करण्यात येतील.

याप्रकरणी कोणतीही हयगय केली जाणार नसून वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा रद्द करण्यात येईल अशा इशारा वाहतूक पोलीसांकडून देण्यात आलाय.

पर्यटकांना गोव्यातील वातावरणाचा आनंद घेता यावा यासाठी प्रशासन सज्ज असून येणाऱ्या पर्यटकांनी सुद्धा इथल्या नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. हुल्लडबाजी करत, दारू पिऊन अपघात घडवणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा सज्जड इशाराही त्यांनी दिलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT