Goa Vaccination
Goa Vaccination Dainik Gomantak
गोवा

Goa Vaccination: 24 तासांत 17 हजार लोकांचे लसीकरण

दैनिक गोमन्तक

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसाला कोरोना लसीकरणाचा दोन कोटींचा आकडा पार करून देशाने नवीन विक्रम नोंदविला. काल दिवसभरात (24 तासांत) दोन कोटी 22 लाखांहून अधिक जणांना लशीची मात्रा देण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनानिमित्त दिवसभरात 25 हजार लोकांना कोविड लस देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले होते, मात्र कायमस्वरूपी आरोग्य केंद्र तसेच टिका उत्सव केंद्र मिळून 17,327 लसीकरणाची नोंद झाली. गेल्या चोवीस तासांत एकाचा मृत्यू झाला, तर 108 नवे कोरोनाबाधित आढळून आले. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 97.71 टक्क्यावर गेली.

राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 700 पेक्षा कमी होती मात्र ती आज 731 वर गेली. यावरून कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नाही, याचे हे संकेत आहेत. गेल्या चोवीस तासांत गृह अलगीकरणात असलेले 75 रुग्ण बरे झाले आहेत, तर इस्पितळात उपचार घेत असलेले 13 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दिवसभरात लसीकरणाचा पहिला डोस 2875 जणांनी तर दुसरा डोस 14,452 जणांनी घेतला आहे. आतापर्यंत पहिला डोस घेतल्यांची संख्या 6,44,553 तर दोन्ही डोस घेतल्यांची संख्या 5,29,529 वर पोहचली आहे.

Vaccination

राज्यांकडे लशींची कमतरता नाही

राज्यांकडे लशींची कमतरता नाही आणि त्यांच्या मागणीप्रमाणे केंद्राकडून सतत डोस पुरविले जात असल्याचा पुनरूच्चार आरोग्य मंत्रालयाने केला आहे. आज संध्याकाळपर्यंत राज्य सरकारांकडे 7 कोटी 60 लाख डोस शिल्लक आहेत. सप्टेंबर महिनाअखेर डीएनए लशीचे 1 कोटी डोस देशाला मिळतील. याशिवाय कोव्हिशिल्डचे 20 कोटी आणि कोव्हॅक्सीनचे 3. 25 कोटी डोस उपलब्ध होतील, असेही मंत्रालयाने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

Sanjana Sawant Death Case: संजना सावंत मृत्यूप्रकरणी सात दिवसात आरोपपत्र दाखल करा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT