Vaccination of more than one lakh citizens in eight days in Goa
Vaccination of more than one lakh citizens in eight days in Goa 
गोवा

Goa Vaccination : गोव्यात आठ दिवसात एक लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण

दैनिक गोमंतक

पणजी -  गोव्यात "टिका उत्सव" अंतर्गत आयोजित करण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 11  जून ते 18 जून या आठ दिवसांमध्ये तब्बल 1 लाख 11 हजार 317 एवढे लसीकरण झाले आहे. 15 लाख लोकसंख्येच्या गोव्यामध्ये आतापर्यंत 8  लाख 28   हजार 950 लसीकरण झाले आहे. (Vaccination of more than one lakh citizens in eight days in Goa)

सर्वात जास्त लसीकरण एका दिवसांमध्ये 13  जून रोजी 18  हजार 662  एवढे झाले आहे. राज्यातील सर्व सरकारी आरोग्य केंद्रे , इस्पितळे, त्याचबरोबर टीका उत्सवासाठी स्थापन करण्यात आलेली पंचायत सभागृह , हायस्कूल आणि इतर ठिकाणची लसीकरण केंद्रे अशा सुमारे  80  ते 85  जागी सध्या राज्यात लसीकरण सुरू आहे. 

31  जुलै 2021 पर्यंत राज्यातील शंभर टक्के नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. 

दरम्यान, गोव्यामध्ये आतापर्यंत 1 लाख 63 हजार 927 नागरिक कोरोना बाधित झाले. त्यातील 1 लाख 57 हजार 363 नागरिक बरे झालेले आहेत. गोव्यात कोरोणामुळे आतापर्यंत 2 हजार 975 व्यक्ती दगावल्या असून सक्रिय कोरोना बाधितांची संख्या चार हजारच्या खाली म्हणजे 3, 599 एवढी आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 95 . 99 टक्के आहे तर कोरोना पॉझिटिव्हिटी दर आठ टक्केपेक्षा खाली 7. 84 टक्के एवढा झालेला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT