Goa Vaccination: Goa government will run vaccination drive 3.2 Dainik Gomantak
गोवा

Goa Vaccination: राज्यात लासोत्सव 3.2, 185 लसीकरण केंद्र खुली

आरोग्य खात्याने आज ता 16 सप्टेंबर पासून टीका उत्सव 3.2 सुरु केला आहे (Goa Vaccination) .

Abhijeet Pote

गोवा सरकारने (Goa Government) राज्यातील ज्या नागरिकांनी अद्याप कोरोना (COVID-19) प्रतिबंधक लसीचा (Vaccine) डोस घेतला नाही त्यांना तो घेण्यासाठी सुविधा व्हावी ,यासाठी आरोग्य खात्याने आज ता 16 सप्टेंबर पासून टीका उत्सव 3.2 सुरु केला आहे (Goa Vaccination) . सरकारी इस्पितळे व आरोग्य केंद्रे येथील कायमस्वरुपी 40 लसीकरण केंद्रासह गावागावांतील पंचायतींच्या मागणीनुसार एकूण 185 केंद्रात हे लसीकरण होणार आहे. यातील किमान 70 केंद्रे पुढील आठ दिवस दरदिवशी कुठे ना कुठे सुरुच राहणार आहेत. (Goa Vaccination: Goa government will run vaccination drive 3.2)

गोव्यातील पहिला डोस 100 टक्के झालेला आहे, मात्र दुसरा डोस अद्याप 55 टक्के लोकांनी घेतलेला नाही. या टीका उत्सवाची प्रसिध्दीही सरकारद्वारे होत आहे. मात्र पणजी येथील लसीकरण केंद्रातील एका अधिकाऱ्यांमुळे येथील टीका उत्सव प्रसिध्दीपासून दूर राहण्याची शक्यता आहे. पणजी डॉन बास्को येथील लसीकरण केंद्रातील हा अधिकारी वर्तमानपत्रांच्या छायाचित्रकारांना छायाचित्रे काढण्यास मज्जाव करत आहे. छायापत्रकार तेथे गेले असता त्यांनी वरिष्ठाकडून परवानगी आणण्यास सांगितले. त्यामुळे वरिष्ठांनी या अधिकाऱ्याला लसीकरणाला राज्यात प्रसिध्दीची गरज आहे, हे सांगावे लागेल हे मात्र नक्की

दरम्यान राज्यातील 1 लाख 70 हजार नागरिक येत्या आठ दिवसात कोरोना प्रतिबंधक लसीला दुसरा डोस (Covide - 19 Vaccination) घेणार आहेत. कारण त्यांचा पहिल्या डोसनंतचा 90 दिवसाचा काळ येत्या आठवड्यात संपत आहे. असी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr. Pramod Sawant) यांनी आज दिली. पर्वरी येथे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे (Health Minister Vishwajit Rane), आरोग्य संचालक डॉ. जुझे डिसा व गोवा वैद्यकिय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यानी वरील माहिती दिली. राज्यातील 18 वर्षावरील सर्व नागरिकांना ३१ ऑक्टोबर पर्यंत दोन्ही डोस देण्यासाठी उद्यापासून उद्यापासून टीका उत्सव 3.2 चे आयोजन करण्यात आले आहे. असेही मुख्यमंत्र्यानी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT