Covide Vaccination (Goa Vaccination) Dainik Gomantak
गोवा

Goa Vaccination: 5 सप्टेंबर पूर्वी शिक्षक वर्गाचं लसीकरण पूर्ण होणार?

Dainik Gomantak

Goa Vaccination: कोविशिल्ड लसीच्या (Covishield Vaccine) दोन डोसांमधील अंतर वाढवून 12 ते 16 आठवडे करण्यात आले होते. मे महिन्यात घेतलेल्या भारत सरकार (Government of India) घेतलेल्या या निर्णयावरून बरीच चर्चाही रंगली होती. दरम्यान कोरोना अँटीबॉडीज (Antibodies) वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले होते. अशातच आता गोवा सरकारने शिक्षकांचं लसीकरण (Teachers Vaccination) लवकरात लवकार पूर्ण व्हावे यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामध्ये फक्त शिक्षकांसाठी कोरोनाच्या दोन डोसांमधील कमी करण्यात आल्याचं समोर आले आहे.

गोवा सरकारनं (Goa Government) घेतलेल्या निर्णयाप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना कोरोना लसींच्या (Corona Vaccine) दोन डोसांमधील अंतर कमी करून १२ आठवड्यांवरून आता ६ आठवड्यांवर आणले आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हा विशेष निर्णय लागू करण्यात आला. कोरोना लसीकरण हे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये (Vaccine for Teachers and School staff) वेगाने व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले जातंय.

5 सप्टेंबर पूर्वी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचं लसीकरण पूर्ण करण्याचा ध्येय निश्चित करण्यात आले असल्याचे कोविड लसीकरणाचे नोडल ऑफिसर डॉ अनुर नेत्रवळकर यांनी ही माहिती दिली. सरकारच्या या निर्णयामुळे शिक्षकांच्या लसीकरणाच वेग वाढेल, अशी आशा आहे.

नवी दिल्लीमध्ये आजपासून शाळा सुरू करण्यात आल्या तर इतर राज्यांत काही प्रमाणात महाविद्यालये सुरू करण्यात आले आहेत. सरकार ऑफलाईन शाळा सुरू करण्याच्याविषयी प्रयत्नशील असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. गेले दीड वर्ष ऑनलाईन शाळांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले. त्याशिवाय कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीतीही आहे, अशा पार्श्वभूमीवर लसीकरणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळेच सरकारने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितले जात आहे. आता राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या निर्णयाचा लाभ घेत शक्य तितक्या लवकर लसीकरण पूर्ण करून घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: गोव्याचे आजपासून मिशन सिक्कीम! मागच्या लढतीतील चुका टाळण्याचे आव्हान

BCCI T20 Tournament: गोवा महिला क्रिकेट संघाची दणदणीत कामगिरी! जम्मू-काश्मीरचा आठ विकेट राखून पराभव

Karnataka: मुरुडेश्वर मंदिरात बॉम्बस्फोट करण्याचा कट उधळला, कर्नाटकात सहा दहशतवाद्यांना अटक

CM Pramod Sawant: राष्ट्रीय प्रवासात 'गोवा' महत्त्वाची भूमिका बजावेल! मुख्यमंत्री सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Sancoale News: क्विनीनगरात तणाव! 'रस्ता' प्रश्नावरून नागरिक आक्रमक'; आमदार वाझ यांची मध्यस्थी

SCROLL FOR NEXT