Goa Vaccination Update : काणकोण सामाजिक आरोग्य केंद्राने आयोजित केलेल्या लसीकरण महाअभियानात नऊ केंद्रातून 848 नागरीकांचे लसीकरण. Dainik Gomantak
गोवा

Goa Vaccination: नऊ केंद्रातून 848 नागरीकांचे लसीकरण पूर्ण

अंथरूणाला खिळून असलेल्या रूग्णांची घेतली दखल

दैनिक गोमन्तक

काणकोण (Canacona) सामाजिक आरोग्य केंद्राने रविवारी आयोजित केलेल्या लसीकरण (Covid Vaccination) महाअभियानात नऊ केंद्रातून 848 नागरीकांचे करोना लसीकरण करण्यात आले.(Goa Vaccination) सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत एकाच दिवशी नऊ ठिकाणी करोना लसीकरण महा अभियानाचे आयोजन केले होते.या अभियानाअंतर्गत जे रूग्ण अंथरूणाला खिळून आहेत त्यांची माहिती आगावू घेऊन वैद्यकीय पथक संबंधीत रुग्णाच्या घरी जाऊन त्यांना लसीकरण करण्यात आले.

माटवेमळ येथे खोला पंचायत सभागृहात 193,आगोंदा उप आरोग्य केंद्र 83,पालिका क्षेत्रात देवगी पुरूष सभागृह 40, श्रीस्थळ पंचायत सभागृह 51, पैंगीण उप आरोग्य केंद्र 108,लोलये येथे पंचायत माशे 39, गावडोंगरी उप आरोग्य केंद्र 118, खोतीगाव पंचायत सभागृह 109,तळपण येथील उप आरोग्य केंद्र 30, अशा नऊ ठिकाणी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.त्याशिवाय काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात 77 रहीवाश्यानी लसीकरणाचा लाभ घेतला.त्याशिवाय 9 नागरिकांना ओळखपत्र नसताना लसीकरणाचा लाभ देण्यात आला.आज रविवार सुट्टीचा दिवस असूनही काणकोण सामाजिक आरोग्य केद्राचे सर्व कर्मचारी डॉक्टर्स, परिचारिका यांनी वेगवेगळ्या नऊ केंद्रावर सेवा दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT