Goa Beaches| Tourism in Goa to Celebrate New Year 2023 | Tourism Celebrate New Year 2023 Sandip Desai
गोवा

New Year Celebration in Goa : गोवा फेस्टिव्ह मूडमध्ये; हॉटेल्स फुल्ल

लाखोंच्या संख्येत देशी-विदेशी पर्यटक दाखल

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Beaches: कोरोनामुळे गेले दोन पर्यटन हंगाम वाया गेल्यानंतर यंदा नाताळ आणि नववर्ष साजरे करण्यासाठी लाखोंच्या संख्येत देशी-विदेशी पर्यटक राज्यात आले आहेत. सध्या हॉटेल्स 90 टक्क्यांहून अधिक फुल्ल झाली असून 27 ते 31 डिसेंबर दरम्यान ती पूर्णपणे भरतील. या काळात सुमारे 5 लाखांहून अधिक पर्यटक येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पर्यटक पूरक व्यावसायिकांत आनंदाचे वातावरण आहे.

गेली दोन वर्षे कोरोना निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक गोव्यात येऊ शकले नाहीत. त्यामुळे देशी पर्यटकांवर राज्यातील पर्यटन उद्योगाला अवलंबून राहावे लागले. मात्र, आता कोरोना नियंत्रणात आल्यानंतर सर्व निर्बंध हटविलेले असून आंतरराष्ट्रीय विमानसेवा पूर्वीप्रमाणे सुरू झाली आहे. परिणामी आठवड्याला 14 ते 15 चार्टर विमान विदेशी पर्यटकांना घेऊन गोव्यात येत आहेत. हाॅटेल, विमान प्रवास महागूनही लोक राज्यात येत आहे. 2023 हे पर्यटनाचे वर्ष ठरेल, असे मत पर्यटन क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

हॉटेल्सच्या दरांमध्ये मोठी वाढ

गोव्यात सध्या 40 हजारांहून अधिक विदेशी पर्यटक दाखल झाले आहेत. तर देशभरातून 4 लाखांहून अधिक लोक आले आहेत. फेस्टिवल हंगामामुळे हॉटेल्स खोल्यांचे दर दुप्पट-तिप्पट वाढले आहेत. शिवाय पर्यटनपूरक व्यावसायिकांना याचा फायदा झाला आहे, अशी माहिती गोवा प्रवास आणि पर्यटन संघटनेने (टीटीएजी) दिली आहे.

‘ईडीएम’चा प्रभाव

कोरोनामुळे गेली दोन वर्षे संगीत पार्ट्यांवर बंदी होती. यावर्षी हे निर्बंध उठवल्याने दि. 27 ते 30 डिसेंबर दरम्यान वागातोर येथे सनबर्न ईडीएम पार्टी होत आहे. यात 80 हजारांहून अधिक नागरिक सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. या इलेक्ट्रॉनिक डान्स विथ म्युझिक फेस्टिवलचा व्यावसायिकांना फायदा होणार, हे निश्‍चित.

कोरोनामुळे धाकधूक

कोरोनाच्या दोन कठीण वर्षानंतर पुन्हा परिस्थिती सामान्य झाली आहे. मात्र, चीन, जपानसह काही देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याने केंद्राने सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुन्हा कोरोनासंदर्भात धोका निर्माण झाल्याने राज्यातील व्यावसायिकांच्या मनात धाकधूक निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT