Goa University  Dainik Gomantak
गोवा

Goa University: गोवा विद्यापीठात बहरला 'इच्छा पूर्ण करणारा वृक्ष'; जॉय ऑफ गिव्हिंगला मोठा प्रतिसाद

चिंबल झोपडपट्टीतील 50 हून अधिक विद्यार्थ्यांना गरजू साहित्याचे वाटप

Akshay Nirmale

Goa University: गोवा विद्यापीठातील मनोहर पर्रीकर स्कूल ऑफ लॉ, गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी या विभागाने गेल्या आठवड्यात एक सामाजिक उपक्रम राबवला. दान उत्सव असे या उपक्रमाचे नाव होते.

त्यात विद्यार्थ्यांनी विविध देणगीदारांकडून जीवनावश्यक वस्तू, साहित्य गोळा केले आणि चिंबल येथील झोपडपट्टीतील 50 हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना हे साहित्य दिले.

दान उत्सव किंवा जॉय ऑफ गिव्हिंग या नावाने 2 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत हा उपक्रम गोवा विद्यापीठाच्या या विभागाने साजरा केला.

विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी यात पुढाकार घेतला. भूपाली गावकर आणि पूनम मलिक यांनी एल शादाई या एनजीओसाठी फील्डवर्क केले होते. त्यांनी चिंबल झोपडपट्टीतील कम्युनिटी सेंटरमध्ये काम केले. येथे त्यांनी 50 हून अधिक वंचित मुलांशी संवाद साधला.

स्वयंसेवी संस्था आणि विद्यार्थ्यांनी एक इच्छा वृक्ष तयार केला. जिथे वंचित मुलांनी त्यांना काय हवे आहे ते व्यक्त केले.

इच्छा वृक्ष GU कॅम्पसमध्ये ठेवण्यात आला आणि विद्यार्थी, प्राध्यापक सदस्य, प्रशासकीय कर्मचारी आणि सामान्य लोक येथे त्या इच्छेनुसार स्टेशनरी, प्रसाधन सामग्री आणि किराणा सामान दान करताना दिसून आले.

11 ऑक्टोबर रोजी, या वस्तू विद्यापीठाचे कुलगुरू, प्रा. हरिलाल बी. मेनन, तसेच मनोहर पर्रीकर स्कूलचे सर्व शिक्षक सदस्य यांच्या उपस्थितीत चिंबल येथील मुलांना भेट म्हणून हे साहित्य सुपूर्द करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session:राज्यात अनेक घर फोड्या करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केलेल्या आरोपीला अटक

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

GIDC:‘आयडीसी’च्या संचालकांवर गुन्हे नोंदवा! फेरेरांची मागणी; वित्तीय शिस्त न पाळल्याचा ठेवला ठपका

Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

SCROLL FOR NEXT