Goa University|Student Election  Dainik Gomantak
गोवा

Goa University: नवीन शैक्षणिक वर्षात निवडणूक घ्या; ‘एनएसयुआय’ची कुलगुरूंकडे मागणी

गोवा विद्यापीठ येत्या काही दिवसांत विद्यार्थी परिषदेची निवडणूक घेऊ पाहते आहे.

दैनिक गोमन्तक

Goa University: गोवा विद्यापीठ येत्या काही दिवसांत विद्यार्थी परिषदेच्या निवडणूक घेऊ पाहते आहे. परंतु सध्या राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. अशावेळी निवडणूक घेतल्यास परीक्षांमुळे विद्यार्थी सक्रिय सहभाग घेऊ शकणार नाहीत.

त्यामुळे कुलगुरूंनी परीक्षेनंतर निवडणूक घ्यावी अथवा नवीन शैक्षणिक वर्षात निवडणूक घ्यावी, अशी मागणी गोवा विद्यापीठाकडे केली असल्याचे ‘एनएसयुआय’चे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी सांगितले.

कुलगुरूंच्या भेटीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. चौधरी म्हणाले की, दरवर्षी गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होतात; परंतु कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे या निवडणुकाच झालेल्या नाहीत.

ऑगस्टमध्ये निवडणूक व्हावी, अशी मागणी आम्ही कुलसचिवांकडे केली होती. शैक्षणिक वर्ष सुरू होताच निवडणूक होणे गरजेचे असते, जेणेकरून विद्यार्थी परिषदेद्वारे विविध उपक्रम राबविण्यास वेळ मिळतो.

सरकार विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी दहा लाख रुपये देते. परंतु निवडणुकीनंतर नव्याने निवडून आलेले मंडळ ते पैसे कसे वापरणार, असा सवालही चौधरी यांनी उपस्थित केला.

सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने त्या संपल्यावर निवडणूक घ्यावी, अशी मागणी आम्ही कुलगुरूंची भेट घेऊन केल्याचे चौधरी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT