Goa University Paper Leak Scam Dainik GOmantak
गोवा

Goa University: पेपर फॉर लव्ह स्कॅम! पोलिसांकडून पुन्‍हा 2 तास चौकशी; प्रणव नाईकचे अपेक्षित सहकार्य नाही

Goa University Professor Paper Leak Scam: गोवा विद्यापीठातील काही कर्मचाऱ्यांना साक्षीदार म्हणून चौकशीस उद्या २५ रोजी उपस्थित राहण्यासाठी समन्स पाठवण्यात आले आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोवा विद्यापीठातील प्रश्‍नपत्रिका चोरीप्रकरणी आगशी पोलिसांकडून साहाय्यक प्राध्यापक प्रणव नाईक याची आज दुसऱ्यांदा सुमारे दोन तास चौकशी करून जबानी नोंदवून घेण्यात आली; मात्र त्याच्याकडून सहकार्य मिळाले नाही.

गोवा विद्यापीठाकडून या एकूण प्रकरणाबाबत उत्तर मागण्यात आले आहे. या प्रश्‍नपत्रिकाच्या सुरक्षिततेसंदर्भातची तसेच त्याची जबाबदारी कोणाकडे असते त्या कर्मचाऱ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. दुपारपर्यंत या प्रकरणी काही घडामोडी घडण्याची शक्यता आहे, अशी माहिती आगशी पोलिस सूत्रांनी दिली.

गोवा विद्यापीठातील काही कर्मचाऱ्यांना साक्षीदार म्हणून चौकशीस २५ रोजी उपस्थित राहण्यासाठी समन्स पाठवण्यात आले आहे. संशयित प्रणव नाईक याचे मोबाईल कॉल डिटेल्स मिळण्यास विलंब होत आहे. ही माहिती मिळाल्यावर तपासकामाला वेग येईल. गोवा विद्यापीठाने दिलेला चौकशी अहवाल सादर केला असला तरी सखोल चौकशी केलेली नाही. नाममात्र ही चौकशी केलेली आहे.

हे प्रश्‍नपत्रिका चोरीप्रकरण काही महिन्यापूर्वीचे असल्याने त्यावेळी प्रश्‍नपत्रिका खोलीत कोणकोण गेले होते त्याची माहिती मिळवण्यात येत आहे. हा प्रकार दोनदा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ज्या विद्यार्थिनीला या प्रश्‍नपत्रिकेचा लाभ झाला तिने इतर कोणाला दिली होती काय, याचाही तपास केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT