Goa university Professor And Student Clash ABVP Dainik Gomantak
गोवा

Goa University: 'राजकीय व्यक्तींकडून माझ्याविरोधात षडयंत्र', प्राध्यापक धमकी प्रकरणात विद्यार्थ्याचा खुलासा

गोवा विद्यापीठातील प्राध्यापक अँथनी व्हिएगस यांना धमकी दिल्याप्रकरणी अखेर शिशिर परब याने माफी मागितली आहे.

Pramod Yadav

Goa University: गोवा विद्यापीठातील प्राध्यापक अँथनी व्हिएगस यांना धमकी दिल्याप्रकरणी अखेर शिशिर परब याने माफी मागितली आहे. कारवाई होत नाही तोपर्यंत निवडणुकीसाठी सहकार्य करणार नाही अशी भूमिका शिक्षक संघटनेने घेतल्यानंतर परबने आगशी पोलीस स्थानकात माफी मागितली.

पण, राजकीय व्यक्तींकडून माझ्याविरोधात षडयंत्र केले जात असल्याचा आरोप शिशिर परब याने केला आहे.

काय म्हणाला परब

'मी विद्यापीठात शिकणारा एक सामान्य विद्यार्थी असून विद्यापीठ निवडणुकीत होणारा गोंधळ मी चव्हाट्यावर आणत होतो. त्यामुळे विद्यापीठांमध्ये राजकीय पक्षाचा पदाधिकारी असणाऱ्या व्यक्तीने माझ्यावर बिन बुडाचे आरोप केले आहेत.'

'जे प्राध्यापक विद्यापीठात राजकारण आणू नये असे म्हणत आहेत आधी त्यांनी स्वतः राजकारणापासून दूर गेले पाहिजे. माझा कुठलाही राजकीय पक्षाशी संबंध नाही. मी विद्यापीठातील या लोकांकडून होणाऱ्या गैरव्यवहाराबद्दल बोलत असल्यामुळे माझ्या विरोधात राजकीय पक्षाच्या व्यक्तींकडून षडयंत्र केले जात आहे.'

'विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणे गुन्हा नाही असे माझे मत आहे. मी कोणत्याही प्राध्यापक यांच्या विरोधात नाही. माझी गोवा विद्यापीठातील प्राध्यापकांना विनंती आहे की त्यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहावे.'

पदव्युत्तर विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीच्या अर्जाची छाननी सुरु असताना, शिशिर परब अचानक इमारतीत घुसला. परबने कर्मचारी आणि विद्यार्थी संघटनेचे निवडणूक प्रमुख प्रा. अँथनी व्हिएगस यांना धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करून कारवाईची मागणी करण्यात आली. पण, कारवाई होत नसल्याने सोमवारी शिक्षण संघटनेने विद्यापीठ परिसरात निषेध नोंदवला.

अखेर, सांयकाळी विद्यार्थी शिशिर परब याने माफी मागितल्यानंतर या वादावर आता पडदा पडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT