Goa University Dainik Gomantak
गोवा

Goa University: एमबीए करायचंय, कामातून वेळ मिळत नाही? गोवा विद्यापीठ देतयं काम करत शिकण्याची संधी

भ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दोन वर्षांचा कामाचा अनुभव बंधनकारक आहे.

Pramod Yadav

Goa University MBA Programme : गोवा विद्यापीठाने 2023 साठी एमबीए (एक्झिक्युटिव्ह) अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवारांना काम करत एमबीएचे शिक्षण पूर्ण करता येणार आहे.

प्रत्येक आठवड्यातील पाच दिवस सायंकाळी एमबीएच्या वर्गांना उपस्थित राहता येईल. तर, शनिवार व रविवार सुट्टीचा आनंद घेता येईल. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दोन वर्षांचा कामाचा अनुभव बंधनकारक आहे.

एमबीए अभ्यासक्रमासाठी एकूण 38 जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यी 28 मार्चपर्यंत गोवा विद्यापीठाच्या ऑनलाइन GUMS पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात.

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात निवड प्रक्रियेबद्दल सर्व अर्जदारांना कळवले जाईल. अर्जदारांची निवड करण्यासाठी एक ग्रुप चर्चा आणि/ वैयक्तिक मुलाखत घेण्यात येईल. असे विद्यापीठाने म्हटले आहे. 2023 ते 2026 या कालावधीत हा अभ्यासक्रम पार पडेल. अभ्यासक्रमासाठी सात समान हप्त्यांमध्ये 2.3 लाख रुपये शुल्क भरावे लागेल.

"कामाचा अनुभव असलेल्या लोकांसाठी शिक्षणाची संधी प्रदान करणे. याच दृष्टीकोनातून हा अभ्यासक्रम डिझाइन करण्यात आला आहे. सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 6.30 ते रात्री 9 पर्यंत क्लासेस शेड्यूल केले आहेत. ज्यामुळे काम करणार्‍या लोकांना आठवड्याच्या शेवटचे दोन दिवस सुट्टीचा आनंद घेता येईल." असे गोवा बिझनेस स्कूलने म्हटले आहे.

एमबीए (एक्झिक्युटिव्ह) प्रोग्राम तीन वर्षांमध्ये नऊ तिमाहींमध्ये विभागलेला आहे. शैक्षणिक अभ्यासक्रम पहिल्या सात त्रैमासिकांमध्ये नियोजित असून, शेवटचे दोन त्रैमासिक उद्योग प्रकल्पासाठी डिझाइन केले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्यावर काम करण्यासाठी फॅकल्टी मेंटर्सचे वाटप केले जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: एफसी गोवा देणार पंजाब एफसीला कडवं आव्हान; मानोलो मार्केझ यांनी इरादे केले स्पष्ट

CM Pramod Sawant: गोव्यात '100 टक्के' विमा संरक्षण देण्याचे लक्ष्य! मुख्यमंत्र्यांनी केले महत्व अधोरेखित

Goa Illegal Fishing: मत्स्योद्योग व्‍यवसाय संकटात! परप्रांतीय टॉलर्सचा राज्यात हैदोस; बुल ट्रॉलिंग, एलईडीद्वारे मासेमारी

IFFI Goa 2024: यंदाही कला अकादमीत इफ्फीच्या चित्रपटांचे स्क्रीनिंग होणार नाही; मुख्यमंत्र्यांची माहिती

Bambolim Nauxim: नावशी-बांबोळी किनारा सौर ऊर्जेने झळाळला! मच्छिमारांची समस्या संपली; सुंदरतेत भर

SCROLL FOR NEXT