Goa University  Dainik Gomantak
गोवा

Goa University : फाडो! शिका 18 व्या शतकातील संगीत प्रकार तेही अगदी 'मोफत', आजच नोंदणी करा

प्रवेशासाठी पूर्व नोंदणी आवश्यक

गोमन्तक डिजिटल टीम

Goa University : विद्यार्थी आणि सर्वसामान्यांना आता राज्यातच फाडो या संगीत प्रकाराचे प्रशिक्षण घेता येणार आहे. या संगीत प्रकाराचा कोर्स प्रथमच गोवा विद्यापीठात शिकवला जाणार आहे. हा अभ्यासक्रम अल्प कालावधीसाठी घेण्यात येणार आहे. अभ्यासक्रम विनामूल्य शिकवला जाणार आहे.

अँथनी गोन्साल्विस (Chair) इन वेस्टर्न म्युझिक, पोर्तुगीज आणि लुसोफोन (Lusophone) स्टडीज प्रोग्राम आणि शेनोई (Shenoi) गोएम्बाब (Goembab) स्कूल ऑफ लँग्वेजेस अँड लिटरेचर यांच्या अंतर्गत फाडो अभ्यासक्रम आयोजित केला जाणार आहे.

गोव्यातील सोनिया शिरसाट फाडो अभ्यासक्रमाचे संचालन करणार आहेत. हा अभ्यासक्रम विद्यार्थी आणि सर्वसामान्यांसाठी खुला आणि विनामूल्य आहे. मात्र, प्रवेशासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे.

‘फाडोचा परिचय’ अभ्यासक्रमाचे लेक्चर 8 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत दररोज दुपारी 2.30 ते 5 या वेळेत होईल. यासाठी एक क्रेडिट निश्चित करण्यात आले आहे. लेक्चरला किमान 75 टक्के उपस्थिती लावणाऱ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.

फाडो हा एक अर्ध-शास्त्रीय शहरी लोकगायन शैलीतील संगीत प्रकार आहे. जो 1800 च्या उत्तरार्धात गोव्यात आला आणि बराच काळ गोव्याच्या संगीत भांडाराचा एक भाग आहे. ज्या विद्यार्थ्यांची पहिली भाषा कदाचित पोर्तुगीज नसेल किंवा ज्यांना संगीताचे सखोल ज्ञान नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम विशेषतः तयार केला गेला आहे.

या अभ्यासक्रमाबाबत गोवा विद्यापीठाने म्हटले आहे की “जागतिक संगीताने अलीकडच्या काळात विविध भाषांमध्ये आणि संस्कृतींमधील विविध शैलींचे संगीतदृष्ट्या रंगीत मिश्रण आणले आहे."

"त्यामुळे शतकानुशतके गोव्यात असलेल्या फाडो या कलाप्रकाराचे गोवा आणि भारतातील भावी पिढ्यांसाठी संरक्षण आणि संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. फाडो संगीताचे प्रकार आणि त्याचा इतिहास, वाढ, आंतरराष्ट्रीय स्थिती तसेच या कलाप्रकारातील मूलभूत बारकावे अभ्यासक्रमातून विद्यार्थ्याला समजतील."

"विद्यार्थ्याला कवितेची शैली आणि अर्थ योग्य प्रकारे समजून घेऊन दोन शैलीत दोन फाडोही गाता येतील. फाडो पोर्तुगीजमध्ये असल्याने उच्चारावरही काम केले जाईल. यामुळे विद्यार्थ्याला फाडो गाण्याचे कौशल्य विकसित होईल,” असे विद्यापीठाने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT