Goa University Dainik Gomantak
गोवा

Goa University: विद्यापीठाच्या मेसमधल्या पदार्थात अळ्या; संतप्त विद्यार्थ्यांसह NSUI चा इशारा, 'दखल न घेतल्यास...'

Goa University: गेल्या काही महिन्यांपासून अळ्या सापडल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी अनेकवेळा संबंधित प्रशासनाकडे केल्या होत्या.

Ganeshprasad Gogate

Goa University: गोवा विद्यापीठाच्या कॅम्पसमधील होस्टेलच्या मेस मधल्या जेवणात अळ्या सापडल्याची बातमी समोर आलीय. या घटनेमुळे मेसमधल्या जेवणावर आणि एकंदरीतच कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे विद्यापीठातील विद्यार्थी गेल्या काही महिन्यांपासून मेसच्या खाद्यपदार्थात किडे-अळ्या आढळत असल्याच्या तक्रारी सातत्याने संबंधित अधिकाऱ्यांकडे करूनही याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याची बाब समोर आली आहे.

या प्रकाराबाबत संबंधीत अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी अन्यथा विद्यार्थी आंदोलन उभारतील असा इशारा NSUI (नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया) ने दिला आहे.

विद्यार्थ्यांवर खर्चाचा भार:-

या किळसवाण्या प्रकाराबद्दल मिळलेली माहिती अशी की, होस्टेलच्या जेवणात गेल्या काही महिन्यांपासून अळ्या सापडल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी अनेकवेळा संबंधित प्रशासनाकडे केल्या होत्या.

मात्र प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई न केल्याने विद्यार्थ्यांना बाहेरून ऑर्डर देऊन जेवण मागवावे लागतेय. मेस फी सक्तीची विद्यार्थी फी भारतात.

मात्र एवढे असूनही बाहेरून जेवण मागवावे लागत असल्याने विद्यार्थ्यांना अधिकचा खर्च करावा लागत आहे. तसेच याआधी अन्नातून विषबाधा होऊन आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांना सतत उलट्यांचा त्रास झाला होता.

NSUI चा इशारा:-

या सर्व प्रकारानंतर NSUI ने गोवा विद्यापीठाचे रजिस्ट्रार आणि मेस कॉन्ट्रॅक्टर यांना निवेदन देत याप्रकाराबाबत गांभीर्याने लक्ष देण्याचा इशारा दिला आहे.

तसेच वसतिगृहाच्या मेसच्या करारासाठी नवीन निविदा जारी करावी अशी मागणी करत नियमितपणे दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेची तपासणी करावी असेही म्हटले आहे.

मागील वर्षी २०२३ मध्ये सावईवेरे येथील शाळेतील मुलांना देण्यात येणाऱ्या माध्यान्ह आहारात अळ्या आढळल्या होत्या. या प्रकरणाची शिक्षण खात्याने गंभीर दखल घेत संबंधित अन्न पुरवठादारांचा परवाना रद्द केला होता.

तसेच त्या प्रकारानंतर स्वतः मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दर्जेदार अन्न न पुरवणाऱ्या व हलगर्जीपणा करणाऱ्या स्वंयसाह्य गटांना 'परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल', असा इशारा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

SCROLL FOR NEXT