Goa University Football Dainik Gomantak
गोवा

Goa University Football: दामोदर महाविद्यालयाच्या नायब खानची हॅटट्रिक; जीव्हीएम कॉलेजवर 5-0 गोलने एकतर्फी मात

जोसेफ वाझ, डीएम्स, पीसीसीई, केपे, काकुलो संघाचेही विजय

किशोर पेटकर

Goa University Football: गोवा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन पुरुष फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी श्री दामोदर महाविद्यालयाच्या विजयात नायब खान याने हॅटट्रिक साधली. याशिवाय सेंट जोसेफ वाझ, डीएम्स, पाद्री कोसेसाव अभियांत्रिकी, केपे, श्रीदोरा काकुलो महाविद्यालय यांनीही आगेकूच राखली.

नावेली येथील रोझरी मैदानावर मडगावच्या श्री दामोदर महाविद्यालयाने फोंड्याच्या जीव्हीएम महाविद्यालयाचा 5-0 असा धुव्वा उडविला. नायब याच्या तीन गोलव्यतिरिक्त गौरव सिंग याने दोन गोल केले.

नावेली येथील आणखी एका सामन्यात केपे सरकारी महाविद्यालयाने गोलशून्य बरोबरीनंतर आसगावच्या आग्नेल इन्स्टिट्यूटला टायब्रेकरद्वारे 4-3 असे पराजित केले. याच मैदानावर म्हापशाच्या श्रीदोरा काकुलो महाविद्यालयाने बोर्डा सरकारी महाविद्यालयाचा 5-1असा फडशा पाडला.

काकुलो महाविद्यालयासाठी आर्यन पोळ व साईदीप पोंबुर्फेकर यांनी प्रत्येकी दोन, तर अमन गोवेकरने एक गोल केला, बोर्डा महाविद्यालयाची पिछाडी सोहेल याने कमी केली.

ताळगाव पठारावरील विद्यापीठ मैदानावर चुरशीच्या लढतीत कुठ्ठाळीच्या सेंट जोसेफ वाझ महाविद्यालयाने मडगावच्या जी. आर. कारे कायदा महाविद्यालयास 1-0 असे निसटते हरविले. निर्णायक गोल शुभम गावस याने 55 व्या मिनिटास केला.

आसगावच्या डीएम्स महाविद्यालयाने खांडोळा सरकारी महाविद्यालयास 2-1असे पराजित केले. डीएम्स महाविद्यालयाच्या निकोलस डिकॉस्ता याने दोन्ही गोल केले. दीप माशेलकर याने खांडोळा सरकारी महाविद्यालयासाठी गोल नोंदविला.

वेर्णा येथील पाद्री कोसेसाव अभियांत्रिकी महाविद्यालयाने (पीसीसीई) धेंपे महाविद्यालयावर 4-2 अशी मात केली.

पीसीसीई संघासाठी ब्लॉयटन एस्ट्रोसियो, ॲरन कार्दोझ, इव्हान दा कुन्हा व राहुल हळर्णकर यांनी प्रत्येकी एक गोल केला. धेंपे महाविद्यालयातर्फे खिंड लढविताना आदित्य बाळेकर व अनंत नागोजी यांनी गोल नोंदविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT